चिपळूण ः चिपळूण-कराड महामार्गावरील पोफळी दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः चिपळूण-कराड महामार्गावरील पोफळी दुरवस्था
चिपळूण ः चिपळूण-कराड महामार्गावरील पोफळी दुरवस्था

चिपळूण ः चिपळूण-कराड महामार्गावरील पोफळी दुरवस्था

sakal_logo
By

- rat६p१३.jpg
L41196
ः चिपळूण ः सार्वजनिक बांधकामला निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.
---------
पोफळी मार्गाची दुरवस्था; बांधकामचे लक्ष वेधले

चिपळूण, ता. ६ ः चिपळूण-कराड महामार्गावरील पोफळी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका व्हावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे यांनी शिष्टमंडळासमवेत कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पोफळी येथील ग्रामस्थांनी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे या महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भातील निवेदन दिले. या वेळी चर्चेदरम्यान मुळे यांनी बुधवारपासून खड्डे बुजवण्यासाठी सुरवात केली जाईल, असे सांगितले. निवेदन देताना काँग्रेसचे महादेव चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष अप्लेश मोरे, पोफळी ग्रामपंचायत सदस्य मैनुद्दीन सय्यद, राजेंद्र भुरण, यश पिसे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84610 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..