
राजापूर ः राजापुरात कॉंग्रेसकडून महागाईचा निषेध
-rat६p३.jpg
41156
ः राजापूर ः नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, मंदार सप्रे, कणेरी, उल्हास सप्रे आदी.
--------------
राजापुरात कॉंग्रेसकडून महागाईचा निषेध
राजापूर, ता. ६ ः दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. या वाढत्या महागाईसह जीवनावश्यक वस्तूंवरील वाढवण्यात आलेली जीएसटी आणि अग्नीपथ योजनेच्या विरोधात तालुका काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाचा निषेध केला. याबाबतचे निवदेनही तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांना निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाकाळकर यांच्यासह युवक काँग्रेसचे मंदार सप्रे, महिला तालुकाध्यक्ष सावित्री कणेरी, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हासशेठ देसाई, केळवली विभाग अध्यक्ष संतोष कुळ्ये, कशेळी ग्रामपंचायत सदस्य अनंत फणसे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84613 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..