शिवसेनेच्या कणकवली शहरप्रमुखपदी वाळके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या कणकवली शहरप्रमुखपदी वाळके
शिवसेनेच्या कणकवली शहरप्रमुखपदी वाळके

शिवसेनेच्या कणकवली शहरप्रमुखपदी वाळके

sakal_logo
By

41216
कणकवली : येथील विजयभवनमध्ये शिवसेनेच्या नवीन कार्यकारिणीचा सत्‍कार करताना पदाधिकारी.


शिवसेनेच्या कणकवली
शहरप्रमुखपदी वाळके

तालुका संघटकपदी गौरव हर्णे

कणकवली, ता. ६ : शिवसेना कणकवली तालुक्‍याची नवीन कार्यकारिणी आज निवड केली. यात शहरप्रमुखपदी उमेश वाळके, तर तालुका संघटकपदी गौरव हर्णे यांची निवड झाली. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
नव्या कार्यकारिणीमध्ये उपतालुकाप्रमुखपदी महेश कोदे, सोमा गायकवाड, अजित काणेकर, राजन म्हाडगुत, प्रमोद मसुरकर, संतोष पुजारे, वैभव मालंडकर, जोगेश राणे यांची निवड केली, तर महिला उपशहरप्रमुखपदी दिव्या साळगावकर आणि युवासेना तालुका संघटक गौरव हर्णे यांची निवड झाली. आगामी काळात विभागवार बैठक घेऊन त्या त्या विभागांत नवीन कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देण्यात येणार असल्याचे यावेळी शिवसेना नेत्यांनी संगितले.
तालुका कार्यकारिणी निवडीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू, राजू राठोड, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना समन्वयक तेजस राणे, सिद्धेश राणे, युवासेना शहरप्रमुख आदित्य सापळे, सोहम वाळके, वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, संतोष परब, विलास जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84627 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..