देवगड तालुक्याला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड तालुक्याला पावसाने झोडपले
देवगड तालुक्याला पावसाने झोडपले

देवगड तालुक्याला पावसाने झोडपले

sakal_logo
By

41220
जामसंडे ः पावसामुळे येथे रस्त्यावरून वाहणारे पाणी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडला पावसाने झोडपले
देवगड, ता. ६ ः विश्रांतीनंतर पावसाने तालुक्याच्या किनारपट्टी भागाला चांगलेच झोडपून काढले. रात्रभर जोराचा पाऊस झाला. आज दुपारपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सततच्या पावसाने जामसंडे येथे देवगड-नांदगाव मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. दाभोळे तसेच ग्रामीण भागातील अन्य रस्त्यावरही पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
मध्यंतरी पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेती अडचणीत सापडण्याची चिन्हे होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच शुक्रवारी रात्रीपासून किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपले. रात्रीपासून जोराचा पाऊस झाला. आज दुपारपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बाजारातही शुकशुकाट जाणवत होता. देवगड-नांदगाव मुख्य रस्त्यावर जामसंडे येथे रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84631 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top