‘हर घर तिरंगा’साठी सहकार्य करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हर घर तिरंगा’साठी सहकार्य करा
‘हर घर तिरंगा’साठी सहकार्य करा

‘हर घर तिरंगा’साठी सहकार्य करा

sakal_logo
By

41228
पळसंब ः डेमो हाऊस उद्‍घाटन प्रसंगी राजेंद्र पराडकर आदी.

‘हर घर तिरंगा’साठी सहकार्य करा

राजेंद्र पराडकर ः पळसंब येथे डेमो हाऊस

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ६ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ फडकावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी केले. पळसंब येथे उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास डेमो हाऊसच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधत असताना त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक स्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती, स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारी साधनसामुग्री आदीचा विचार करून बांधकाम करण्यात येणारे घरकूल हे लाभार्थ्यांना राहण्यासाठी सोईस्कर व सुलभ ठरू शकेल, या दृष्टीने घरकूल बांधकामाला मार्गदर्शक व त्याप्रकारे त्या ठिकाणची घरकुले बांधली जावीत, या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात डेमो हाऊस बांधली जात आहेत. मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत येथे बांधण्यात आलेल्या डेमो हाऊसचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती मालवणचे गटविकास अधिकारी गुजर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, पंचायत समिती विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, कृषिविस्तार अधिकारी गोसावी, व्ही. के. जाधव, उपसरपंच सुहास सावंत, कृषी सहाय्यक कुरकुटे, पंचायत समिती बांधकाम विभाग जिल्हा परिषद उपविभागचे शाखा अभियंता मगर, आडवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अरुण माने आदी उपस्थित होते. ग्रामसेवक अमित कांबळी यांनी स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84637 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..