भक्त सेवा मंडळामार्फत सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भक्त सेवा मंडळामार्फत 
सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका
भक्त सेवा मंडळामार्फत सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका

भक्त सेवा मंडळामार्फत सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका

sakal_logo
By

41229
सावंतवाडी ः रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी पोलिस निरीक्षक शंकर कोरे, संजू परब आदी.

भक्त सेवा मंडळामार्फत
सावंतवाडीला रुग्णवाहिका
सावंतवाडी, ता. ६ ः अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ आणि जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गतर्फे रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. सावंतवाडी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण शनिवारी माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते झाले. या रुग्णवाहिकेतून सावंतवाडी शहरात मोफत सेवा दिली जाणार आहे.
यावेळी आरटीओ अधिकारी मारुती चौगले, सुदीन तेंडुलकर, पीठप्रमुख अमुल कुलकर्णी, पीठ व्यवस्थापक जिल्हा निरीक्षक संदीप नार्वेकर, दीपक खरुडे उपस्थित होते. प्रवचनकार विलास परब यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थानच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या वतीने महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा गेली सतरा वर्षे सुरू आहेत. या उपक्रमांतर्गत सुमारे ३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आज सावंतवाडी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. प्रवचनकार प्रिया परब यांनी सूत्रसंचालन केले. खरुडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84638 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..