पावस- महासंस्कृतीतर्फे पावस येथे पाककला स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस- महासंस्कृतीतर्फे पावस येथे पाककला स्पर्धेचे आयोजन
पावस- महासंस्कृतीतर्फे पावस येथे पाककला स्पर्धेचे आयोजन

पावस- महासंस्कृतीतर्फे पावस येथे पाककला स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पावसला १२ ऑगस्टला पाककला स्पर्धा

महासंस्कृती व्हेंचर्स; रानभाज्यांची चव चाखता येणार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः पुण्याच्या महासंस्कृती व्हेंचर्सतर्फे कोकणातील पारंपरिक पदार्थ हे सर्वदूर पसरावेत आणि ते टिकून राहावेत, या उद्देशाने येत्या शुक्रवारी (ता. १२) येथील राममंदिरात दुपारी ३ ते ५ वा. ''चव रानभाज्यांची'' या पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि मोफत आहे. स्पर्धेत कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील, वयोगटातील स्त्री-पुरुष, लहान मुले भाग घेऊ शकणार आहेत. स्पर्धेपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
रानभाज्यांचा वापर करून केलेले पदार्थ व कोकणातील पारंपरिक पदार्थ (केवळ शाकाहारी, गोड किंवा तिखट) हे स्पर्धेचे विषय आहेत. महासंस्कृती हे अनोखे आणि आगळेवेगळे व्यासपीठ आहे. महासंस्कृती ही एक संस्था आहे आणि आपल्यासारख्या अनुभवी जाणकारांचे एक कुटुंबदेखील आहे. संस्कृती, कला, इतिहास, निसर्ग, खाद्यसंस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करणारी तज्ञ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, तरुण इन्फ्लुएन्सर्स आणि जाणकार मंडळी एकाचवेळी एकाच व्यासपीठावर एकत्रित येण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. समाजातील सर्वांच्या सहभागातून आणि प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील हा अनमोल वारसा केवळ जतनच होणार नाही तर आपला हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत तसेच जगभरात पोचेल, यासाठी महासंस्कृती कटिबद्ध आहे.
पावसाळा सुरू झाला की, कोकणात सर्वत्र विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या मुख्यत्वेकरून जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात आढळतात. या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या भाज्यांची सर्वांना ओळख व्हावी आणि यातून आपली खाद्यसंस्कृती सर्वांना उलगडावी, हा देखील स्पर्धा आयोजित करण्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. पाककलेत पारंगत असलेल्या सर्वांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या पदार्थाची गोडी इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन महासंस्कृतीमार्फत केले आहे.
--------------
चौकट १
स्पर्धेचे नियम
स्पर्धेसाठी पदार्थ घरूनच बनवून आणावा. स्पर्धकांनी वरील विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर पदार्थ बनवून आणावा. परीक्षक पदार्थाची कृती, माहिती, चव, सजावट, सादरीकरण यांचा विचार करून गुण प्रदान करतील. पदार्थासोबत पदार्थाची कृती सुवाच्च अक्षरात लिहून आणावी. नावनोंदणीसाठी संजना मराठे, कुर्धे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84646 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..