राजापूर ःदमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःदमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
राजापूर ःदमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

राजापूर ःदमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By

पाउस चित्र वापरा
.......
-rat६p१८.jpg
41231
ः राजापूर ः भाताच्या खाचरामध्ये साचलेले पाणी.
-----------
पिके तरली, पाण्याने खाचरे भरली

राजापुरात मुसळधारेने शेतकऱ्यांना दिलासा; रखडलेल्या लावणीच्या कामांना पुन्हा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः भातलावणीच्या ऐन हंगामामध्ये दडी मारलेला पाऊस दोन दिवसापूर्वीपासून परतला आहे. गेले दोन दिवस तालुक्यामध्ये दमदारपणे पाऊस पडत आहे. त्यामुळे रखडलेली भातशेतीची कामे पुन्हा सुरू झाल्याने शेतकर्‍यांना काहीसे हायसे वाटले आहे, तर पाण्याअभावी भेगा पडलेल्या लावणी झालेल्या शेतांच्यापुन्हा एकदा पावसाचे पाणी साचल्याने सुकू लागलेल्या भातरोपांना नवसंजीवनी मिळाली आहे.
सातत्यपूर्ण पावसामुळे तालुक्यामध्ये भातशेतीच्या लावणीच्या कामांना यावर्षी वेळेतच आरंभ झाला; मात्र, लावणीच्या ऐन हंगामामध्ये नेहमीप्रमाणे पावसाने दडी मारल्याने भातलावणीच्या कामांना ब्रेक लागला. काही शेतकऱ्‍यांनी पेट्रोल वा डिझेल पंपाच्या साहाय्याने पाणी उपलब्ध करत भातलावणीची कामे सुरू ठेवली होती. काहींनी उरकली; मात्र, ज्यांना पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने त्यांची भातलावणीची कामे गेल्या काही दिवसांपासून पाण्याअभावी खोळंबली होती. लावणीसाठी रूजवात केलेल्या रोपांची कमालीची वाढ झाली होती; मात्र, पावसाअभावी त्यांची लावणी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे रखडलेली लावणीची कामे पूर्ण करण्यासाठी पाऊस कधी येणार, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांकडून विचारला जात होता. दुसऱ्‍या बाजूला लावणी केलेल्या शेताच्या खाचरांमध्ये पाण्याअभावी भेगा पडल्या होत्या. त्यातून लावणी केलेली रोपे सुकू लागली होती. पावसाची दडी तशीच राहिल्यास सुकलेली ही रोपे मरून जाण्याची भीती शेतकऱ्‍यांकडून व्यक्त केली जात होती.
...
चौकट
शेताच्या मळ्यांमध्ये पावसाचे पाणी
दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना दिलासा मिळाला असून रखडलेल्या लावणीच्या कामांना पुन्हा एकदा सुरवात झाली आहे तर, भेगा पडलेल्या शेताच्या मळ्यांमध्ये पावसाचे पाण्याने सुकू लागलेल्या रोपांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
-------------
चौकट
दृष्टिक्षेपात पावसाची नोंद
दिनांक*सरासरी पाऊस (मि.मी.)*एकूण पाऊस
४.८.२०२२*७.५**१७१९.६३
५.८.२०२२*९५.५**१८२९.४९
६.८.२०२२*६६.१२**१९६०.६५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84650 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..