गुहागर ः शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य योजनेचा लाभ देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य योजनेचा लाभ देऊ नका
गुहागर ः शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य योजनेचा लाभ देऊ नका

गुहागर ः शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य योजनेचा लाभ देऊ नका

sakal_logo
By

41252 ः संग्रहीत
..........
शासकीय सेवेतील कुटुंबांना अन्नधान्य नको

लाभ थांबवण्याचे गुहागर तहसीलदारांचे दुकानदारांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ६ ः गुहागर तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शनधारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाद्वारे शासकीय अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरित थांबवावा, असे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना दिले आहेत. तसेच अशा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना तहसील कार्यालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ राज्यामध्ये ५ जुलै २०१३ पासून लागू केला आहे. या अधिनियमानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन योजनेतून शासकीय अन्नधान्य वितरण केले जात आहे. मात्र, शासकीय नोकर, शासकीय मानधन इत्यादी शिधापत्रिकाधारक लाभ घेण्यास अपात्र आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांचा शासकीय अन्नधान्याचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरित थांबवण्याचे आदेश तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत.
तहसीलदारांच्या या पत्रामुळे शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या, शिधा घेणाऱ्या ज्या व्यक्ती अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी या दोन योजनेतून अन्नधान्य खरेदी करतात, त्यांचे धाबे दणाणले आहेत.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84653 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..