रत्नागिरी ः पोषण आहाराबाबतच्या लेखी तक्रारी मागवून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पोषण आहाराबाबतच्या लेखी तक्रारी मागवून घ्या
रत्नागिरी ः पोषण आहाराबाबतच्या लेखी तक्रारी मागवून घ्या

रत्नागिरी ः पोषण आहाराबाबतच्या लेखी तक्रारी मागवून घ्या

sakal_logo
By

पोषण आहाराच्या तक्रारींवर
पुढील आठवड्यात निर्णय

इंदुराणी जाखड; लेखी तक्रारी मागवून घेण्याच्या सूचना

रत्नागिरी, ता. ६ ः शहरातील शालेय पोषण आहाराबाबत येणाऱ्‍या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व शाळांमधून लेखी म्हणणे मागवून घेण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात त्यावर योग्य तो निर्णय मुख्याधिकारी स्तरावरून घेतला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.
रत्नागिरी शहरातील शाळांना सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही वितरणाची जबाबदारी तीन ठेकेदारांकडे देण्यात आली आहे. पहिल्या दिवसांपासून एका गटाबाबत काही ना काही तक्रारी येत आहेत. शुक्रवारी (ता. ५) पटवर्धन प्रशालेच्या गुरुकुलमधून निवेदन दिले गेले असून, दरदिवशी शाळांमधून दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्‍या शाळांना पोषण आहार देण्याची जबाबदारी पालिकेची असते. मात्र, त्याचे अनुदान हे सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेमार्फत वितरित होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. याविषयी डॉ. जाखड यांनीही प्रत्येक शाळांना पत्र देऊन त्यांच्याकडून दर्जाबाबत लेखी माहिती किंवा तक्रारी घ्याव्यात, अशा सूचना पालिकेला दिल्या आहेत.
पूर्वी शाळांमध्ये पोषण आहार वितरण करणाऱ्‍या बचतगटांची ठेकेदारांच्या हाताखाली नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्‍यांकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत वितरणातील अडचणी सुरळीत होतील असेही त्यांचे म्हणणे आहे, असे सीईओंनी सांगितले. तसेच जेवणाच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्‍यांनीही दिलेल्या आहेत. त्या दृष्टीनेही लवकरच कार्यवाही होईल.
--------
चौकट
लेखाधिकाऱ्‍यांची चौकशी समिती
निविदा प्रक्रिया राबवताना तांत्रिक त्रुटी ठेवण्यात आल्याची बाब पुढे आल्यानंतर ती तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी चार सदस्यीय चौकशी नेमली आहे. त्यामध्ये महसूल, जिल्हा परिषदेतील लेखा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल मंगळवारपर्यंत अपेक्षित असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84679 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top