कोळकेवाडी धरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळकेवाडी धरण
कोळकेवाडी धरण

कोळकेवाडी धरण

sakal_logo
By

कोळकेवाडी धरणातील अवजलाचा
अभ्यास गट अहवाल लवकरच

मुख्य अभियंत्यांनी घेतला आढावा; २२ ला बैठक

चिपळूण, ता. ६ : कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या अभ्यासासंदर्भात आतापर्यत झालेल्या बैठका, गेल्या महिन्यात घेण्यात आलेले वाशिष्ठी नदी पातळीचे अहवाल यांचा आढावा शनिवारी पोफळी येथे महाजनकोचे मुख्य अभियंता यांच्या सभागृहात आयोजित अभ्यास गट बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे अभ्यास गट अंतिम अहवाल लवकरच तयार करणार आहे. पुढील बैठक २२ ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे.
या अभ्यास गटाचे अध्यक्ष व जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मागील दोन बैठकांमधील चर्चेचा आढावा घेण्यात आला. आतापर्यत आलेल्या महापुरांच्यावेळी झालेला पाऊस, सुटलेले अवजल आणि समुद्राची भरती-ओहोटी यांचा तौलनिक अभ्यास करण्याचे दृष्टीने गेल्या जुलै महिन्यात मुसळधार पावसात वाशिष्ठी नदीत भरती-ओहोटीवेळी सोडलेले अवजल, त्यामुळे वाढलेली पाणीपातळी तपासण्यात आली त्याबाबतचा अहवाल या बैठकीत ठेवण्यात आला. त्याचबरोबर अभ्यास गट सदस्यांना दिलेल्या विषयावर संकलित केली गेलेली माहिती या बैठकीत प्रत्येकाकडून ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. ज्या कारणासाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात आला त्यानुसार अभ्यास करण्यात आला असून, त्यासाठीची पुरक माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे आता अभ्यास गट अंतिम अहवाल तयार करणार आहे. त्यासाठी पुढील चौथी बैठक २२ रोजी बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला पोफळीतील महाजनकोचे मुख्य अभियंता संजय चोपडे, पाटबंधारेच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, चिपळूण मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शरद जोशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश पाटणकर, ॲग्रो टुरिझमचे संजीव अणेराव हे सदस्य, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार उपस्थित होते. तर पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता जगदिश पाटील, निमंत्रित सदस्य व चिपळूण बचाव समितीचे सदस्य सतीश कदम, किशोर रेडीज अनुपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84790 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..