कणकवली : मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : मुसळधार पाऊस
कणकवली : मुसळधार पाऊस

कणकवली : मुसळधार पाऊस

sakal_logo
By

L४१३५३
कणकवली ः मुसळधार पावसाने गडनदीचे पात्र पुराच्या पाण्याने ओसांडून वाहत आहे. ( छायाचित्र ः प्रथमेश जाधव)
---------
कणकवली परिसराला पावसाने झोडपले
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ७ ः गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने कणकवली शहर आणि परिसराला चांगले झोडपून काढले आहे. त्यामुळे गड नदीपात्र ओसांडून वाहत आहे. नदीपात्रात लगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील सखल भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे.
तालुक्यात पावसाचा झोर कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. सातत्याने पाऊस कोसळत असल्याने नदी नाले दुतडीने भरून वाहूलागले आहेत. गड नदीपत्रातील सर्व बंधारे पाण्यात आले गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरून पायी चालणे अवघड बनले आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील बहुतांशी नदी आणि नाल्याला पूरसदृश्य पाणी आले आहे. सलग दोन दिवस नदीपात्रात पुरसदृश्य स्थिती आहे. भातशेती पाण्याखाली आहे. नदी नाल्याने पाणी आल्याने रस्ता वाहुकीवर परिणाम झाला आहे. आज रविवार असल्याने बाजारपेठेत ही खरेदीला ग्राहक आलेले नाहीत. ढगाळा वातावरणामुळे अंधार दाडून येत आहे. पावासाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84852 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..