कनेडी प्रशाळेचे वक्तृत्वात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी प्रशाळेचे वक्तृत्वात यश
कनेडी प्रशाळेचे वक्तृत्वात यश

कनेडी प्रशाळेचे वक्तृत्वात यश

sakal_logo
By

कनेडी प्रशाळेचे वक्तृत्वात यश
कनेडी,ता. ७ ः रोटरी क्लब ऑफ कणकवली आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी सानिका रामदास काळसेकर (दहावी) हिने प्रथम क्रमांक तर मैत्रेयी मकरंद आपटे (आठवी) हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ही स्पर्धा कणकवली शाळा क्र. ३ येथे नुकतीच झाली. सानिका हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख एक हजार रूपये तर मैत्रेयी हीला प्रशस्तीपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील भाषा विषय शिक्षिका पल्लवी हाटले, संस्कृत अध्यापक मकरंद आपटे व सहायक शिक्षक प्रसाद मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84854 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..