यशस्वी शिक्षण परिषदा ः निपुण भारतचे पहिले पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशस्वी शिक्षण परिषदा ः निपुण भारतचे पहिले पाऊल
यशस्वी शिक्षण परिषदा ः निपुण भारतचे पहिले पाऊल

यशस्वी शिक्षण परिषदा ः निपुण भारतचे पहिले पाऊल

sakal_logo
By

-rat७p२.jpg -
४१४१७
डॉ. गजानन पाटील
------
शिक्षण- लोकल टू ग्लोबल--लोगो

यशस्वी शिक्षण परिषदा ः निपुण भारतचे पहिले पाऊल

निपुण भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशात वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२५-२६ पर्यंत प्रभावीपणे अवगत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनसीईआरटी, राज्यस्तरावरील एससीईआरटी, जिल्हास्तरावरील डाएट, शिक्षण विभाग, तालुकास्तरावरील शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, विषयतज्ज्ञ यांच्या सहयोगाने सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, समाज यांना या निपुण भारत अभियानाची तोंडओळख करून देऊन त्यांना कार्यप्रेरित करण्यासाठी सर्व देशभर प्रयत्न केला जात आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे एससीआरटी, पुणे यांचे स्तरावरून संपूर्ण महाराष्ट्रात ६ ऑगस्टला एकाचवेळी झालेल्या शिक्षण परिषदा होय. प्रत्येक केंद्रात या शिक्षण परिषदांचे ३ तासांसाठी आयोजन उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले होते.
- डॉ. गजानन पाटील
---------------

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या प्रेरणेने व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली डाएट रत्नागिरी व शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी एकाचवेळी जिल्हाभरातील २५४ केंद्रात ६ ऑगस्ट २०२२ ला शिक्षण परिषदा घेण्यात आल्या. त्यासाठी जिल्हास्तरावर त्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील एक केंद्रप्रमुख, एक मुख्याध्यापक, एक विषयतज्ज्ञ आणि एक शिक्षक यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डाएटच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी निपुण भारत अभियान नेमके काय आहे. त्याची पार्श्वभूमी, गरज, महत्व, शासनस्तरावरील प्रयत्न, स्वरूप, ध्येय, अध्ययन निष्पती, निपुण भारत अभियानात शिक्षक, पालक, समाज आणि क्षेत्रीय अधिकारी या विविध भागधारकांची भूमिका कोणती आहे, निपुण भारत अभियान पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), शाळापूर्व तयारी, पहिले पाऊल स्वरूप व अंमलबजावणी, विद्याप्रवेश, अध्ययन-अध्यापन साहित्यांचा मराठी, उर्दू, इंग्रजी, गणित यांची कृतीपुस्तिका, परिणामकारक वापर शिक्षक मार्गदर्शिका, हस्तपुस्तिका, चार्ट FLN मूल्यमापन कसे करायचे, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मूल्यमापन कसे केले गेले यासारख्या विषयावर चर्चात्मक संवाद घेतला. शेवटी निपुण भारत अभियानाची प्रतिज्ञा म्हटली गेली. जिल्हास्तरावर तयार झालेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी याच धर्तीवर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील ९ तालुक्यात गटशिक्षणाधिकारी यांच्या देखरेखीखाली तालुकास्तरीय निपुण भारत अभियान कसे घ्यायचे यासाठी केंद्रस्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. त्यानंतर ६ ऑगस्टला २५४ केंद्रात एकाचवेळी तीन तासाची शिक्षण परिषद घेण्यात आली. या शिक्षण परिषदेला संचालक एससीआरटी पुणे आणि जिल्हा व तालुकास्तरावर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चर्चात्मक संवाद झाला. केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी या शिक्षण परिषदांना हजेरी लावली. त्यासाठी केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांनी विशेष मार्गदर्शन केले. या परिषदांना डाएट, शिक्षण विभाग यांनी भेटी दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी उचललेले हे निपुण भारत अभियानाचे हे पाऊल महत्वपूर्ण ठरणारे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला निपुण भारत अभियानाची संकल्पना स्पष्ट झालेने सन २०२६-२७ मध्ये या अभियानाची फलश्रुती निश्चित दिसेल.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84882 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..