9 ऑगस्टपासून काँग्रेसची गौरव पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

9 ऑगस्टपासून काँग्रेसची गौरव पदयात्रा
9 ऑगस्टपासून काँग्रेसची गौरव पदयात्रा

9 ऑगस्टपासून काँग्रेसची गौरव पदयात्रा

sakal_logo
By

जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून
काँग्रेसची गौरव पदयात्रा
चिपळूण, ता. ७ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ९ ते १४ ऑगस्टदरम्यान काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष लियाकत शाह, विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले उपस्थित होते. लाड म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्ती व स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीसाठी काँग्रेसने अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले आहे; मात्र मागील आठ वर्षांत धार्मिकतेच्या नावावर देशभर राजकारण सुरू असून देशाच्या लोकशाहीला व संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. संविधान वाचवण्यासाठी राज्यभरात ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या संख्येने आजादी गौरव पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. राजापूर-रत्नागिरी येथे ९ ऑगस्ट, संगमेश्वरला १० ऑगस्ट, गुहागर- ११, खेड-दापोली- १२, चिपळूणला १३ ऑगस्टला पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी सहभागी होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84893 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..