राजापूर-250 वर्षांनी होणार लक्ष्मीकेशव मंदिराचा जीर्णैद्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-250 वर्षांनी होणार लक्ष्मीकेशव मंदिराचा जीर्णैद्धार
राजापूर-250 वर्षांनी होणार लक्ष्मीकेशव मंदिराचा जीर्णैद्धार

राजापूर-250 वर्षांनी होणार लक्ष्मीकेशव मंदिराचा जीर्णैद्धार

sakal_logo
By

-rat७p३.jpg ः
४१४१९
राजापूर ः श्री देव लक्ष्मी केशव मूर्ती.
-rat७p२८.jpg ः
४१४३५
श्री देव लक्ष्मीकेशव मंदिर
----------------
२५० वर्षांनी होणार लक्ष्मीकेशव मंदिराचा जीर्णैद्धार
मूर्तीला वज्रलेप ; लक्ष्मीकेशव, विष्णूचे दहा अवतार, राई रखुमाई, गरूडाची मूर्ती एकत्र
राजापूर, ता. ७ ः तालुक्याला प्राचीन मंदिरे, वास्तू, धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा तालुक्याच्या विविध भागांमध्ये आढळणार्‍या कातळशिल्पांसह मंदिरांचा समावेश आहे. याचा वारसा शहरातील समर्थ नगर येथील श्रीदेव लक्ष्मीकेशव देवस्थान पुढे चालवत आहे. काळाच्या ओघामध्ये या मंदिराची वास्तू जीर्ण झाली असून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सुमारे २५० वर्षानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
या जीर्णोद्धारामध्ये श्रीदेव लक्ष्मी केशवाच्या मूळ काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण देखण्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील शिल्पकार राकेश कोतारी यांनी हे काम केले आहे. मंदिराचा मुळ ढाचा न बदलता मंदिराच्या वास्तूचे नुतनीकरण करण्यात आले आहे. श्रीदेव लक्ष्मी केशवाच्या मूर्तीसोबतच श्री विष्णूचे दहा अवतार, श्री राई रखुमाई आणि गरूडाची मूर्ती या एकाच पाषाणात कोरलेल्या पाहावयास मिळतात. आगामी गोकुळाष्टमीचा पारंपरिक वार्षिक उत्सव लक्षात घेता त्यापूर्वी नूतन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि धार्मिक विधीसह मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरवात झाली आहे.
मंदिराच्या भाविकांसह देणगीदात्यांच्या सहकार्याने जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे जीर्णोद्धारासाठी दात्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन श्री देव लक्ष्मी केशव सोमेश्वर सेवा मंडळाच्यावतीने केले आहे. याबाबत माहितीसाठी प्रभात ओळकर, अरविंद सप्रे, डॉ. सुयोग परांजपे, रमेश गुणे, नवरे, मंदार दीक्षित यांच्याशी संपर्क साधावा.

चौकट
१६४० मध्ये झाला होता जीर्णोद्धार
निसर्गरम्य परिसर आणि नदीकाठावर श्रीदेव लक्ष्मीकेशव मंदिर असून त्यामध्ये काळ्या पाषाणातील सुबक कोरीव काम असलेली मूर्ती, संस्कृती आणि परंपरा जपत प्रतिवर्षी साजरा केला जाणारा गोकुळाष्टमी उत्सव, नियमित कानी पडणारे वेदपठणाचे घनगंभीर स्वर हे या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सुमारे २५० वर्षापूर्वी शके १६४० मध्ये बाबाजी नवरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून आताची श्रीदेव लक्ष्मी केशवाची मूर्ती प्रतिष्ठापित केल्याचा दाखला मिळतो. पारंपरिक बांधकाम असलेल्या मंदिराची इमारत जीर्ण झाली. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84905 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..