पुरोगामी संघटनेची ९ ला तिरंगा रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरोगामी संघटनेची ९ ला तिरंगा रॅली
पुरोगामी संघटनेची ९ ला तिरंगा रॅली

पुरोगामी संघटनेची ९ ला तिरंगा रॅली

sakal_logo
By

पुरोगामी संघटनेची
९ ला तिरंगा रॅली
चिपळूण ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने ९ ऑगस्टला सकाळी १० वाजता तिरंगा बाईक रॅली काढण्यात येणार आहे. शासनाचा हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे योगदान असावे, हे अभियान घराघरात पोहचावे यासाठी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून ही रॅली काढण्यात येणार आहे. खेर्डी, पिंपळी, मुंढे, शिरगाव, अलोरेपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. चिपळूण पंचायत समिती येथे रॅलीची सांगता होईल. सर्व शिक्षकांनी आपली स्वतःची बाईक, तिंरगा झेंडा त्यासाठी लागणारी काठी घेऊन यामध्ये सहभागी व्हावे. इच्छुकांनी शशिकांत सकपाळ, अमोल भोबस्कर यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------
देवाचेगोठणे येथे
आरोग्य शिबिर
राजापूरः तालुक्यातील ग्रामपंचायत देवाचेगोठणेच्यावतीने आणि देवाचेगोठणे शिक्षण प्रसारक मंडळ, देवाचेगोठणे व विठ्ठल बहुद्देशीय सेवाभावी संस्था बसरेवाडी यांच्या सहकार्याने १४ ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये सर्व वयोगटातील लोकांची मोफत तपासणी करण्यात येणार असून त्यासह ४० वर्षावरील लोकांची मधुमेह तपासणी, मोफत रक्त तपासणी, धनुर्वात इंजेक्शन मोफत, नेत्रतपासणी आदी प्रकारच्या तपासणी केल्या जाणार आहे. सकाळी १० ते २ या कालावधीमध्ये देवाचेगोठणे ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये होणाऱ्या या शिबिरावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित, ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रभाकर आपटे, ग्रामविकास अधिकारी जागेश्‍वर राऊत, देवाचेगोठणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोडये, सचिव अविनाश नवाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
---------------
आविष्कार, कृष्णाची
राज्य स्पर्धेसाठी निवड
दाभोळः डेरवण येथे झालेल्या जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एन. डी. गोळे हायस्कूलमधील आविष्कार येलकर आणि कृष्णा राजभर या दोन खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे त्यांची अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत आविष्कार येलकर याने ३०० मीटर धावणे प्रथम क्रमांक व १०० मीटर धावणे द्वितीय, तर कृष्णा राजभर याने ८०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक व ३०० मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धकांना हर्णै येथील एन. डी. गोळे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक संदीप क्षीरसागर यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84911 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..