नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात कार्यक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात कार्यक्रम

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात कार्यक्रम

sakal_logo
By

L४१४४९

ओळ - मालवण ः नारळी पोर्णिमेनिमित्त शहरात आयोजित कार्यक्रमाची माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने देण्यात आली.

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात कार्यक्रम
पर्यटन महासंघाचा पुढाकार ः रिक्षा संघटनेतर्फे ११ ला भव्य रॅली
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ ः मालवणात साजरा होणाऱ्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना सामावून घेण्यात येणार आहे. ११ ला नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणातील रिक्षा संघटनांच्या सहकार्याने शहरातून रिक्षांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यावर्षी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सागराला श्रीफळ अर्पण करण्याचा मान रिक्षा व्यावसायिक संघटनेला देण्यात येणार आहे. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असून प्रत्येक वर्षी मालवणातील विविध व्यापारी वर्गाच्या घटकांना श्रीफळ अर्पण करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील रुचिरा हॉटेल येथे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, व्यापारी शेखर गाड, रिक्षा व्यावसायिक संघटनेचे पप्या कद्रेकर, हेमचंद्र कोयंडे, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, "मालवण शहर पर्यटनदृष्ट्या देश-विदेशात पोहोचले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेला येथील नारळी पौर्णिमा उत्सव देखील पर्यटकांपर्यंत पोहोचावा, या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नारळी पौर्णिमेदिवशी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरास श्रीफळ ठेवून दुपारी ३ वाजता भरड नाका ते मालवण बंदर जेटी अशी रिक्षांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. यात एक मुख्य रिक्षा सजवून त्यावर नारळाची भव्य प्रतिकृती असणार आहे. इतर रिक्षा पुष्पहाराने सजणार आहेत. पारंपरिक वेशभूषा स्पर्धाही ठेवण्यात आली आहे. रुचिरा हॉटेल येथे स्पर्धकांनी नावनोंदणी करायची आहे. या रॅलीनंतर बंदर जेटी येथे श्रीफळाची विधिवत पूजा करून रिक्षा व्यावसायिकांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात येणार आहे. या रॅलीचे नियोजन व जबाबदारी रिक्षा व्यावसायिकांकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये पर्यटन व्यावसायिक महासंघ, मातृत्व आधार फाउंडेशन, व्यापारी व व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात मालवणातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व्यापारी, पर्यटन व्यावसायिकांनी सहभागी व्हावे."
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84919 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..