देवगड येथे चित्रकला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड येथे चित्रकला स्पर्धा
देवगड येथे चित्रकला स्पर्धा

देवगड येथे चित्रकला स्पर्धा

sakal_logo
By

देवगड येथे
चित्रकला स्पर्धा
देवगड ः स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील रोटरी क्लब ऑफ मँगोसीटीतर्फे शालेय आणि खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सोमवारी (ता.१५) सकाळी साडेदहाला येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे घेण्यात येईल. पहिली ते चौथीसाठी रंगभरण करावयाचे आहे. तसेच पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीच्या गटासाठी ‘ध्वजारोहण सोहळा’ आणि खुला गटासाठी ‘थोर क्रांतिकारक व्यक्तीचित्र’ असा विषय आहे. आयोजकांकडून कागद दिले जातील. रंग व अन्य साहित्य स्पर्धकाने आणावयाचे आहे. पहिली ते चौथीसाठी वस्तूरुपाने बक्षीस दिले जाईल. तर पाचवी ते सातवीच्या गटासाठी अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपये, आठवी ते दहावीसाठी अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये, तर खुला गटासाठी अनुक्रमे १०००, ७०० आणि ५०० रुपये बक्षीस आहे.
................
केरमध्ये शेतीची
हत्तींकडून हानी
दोडामार्ग : पाऊस सुरू झाल्यावर हत्ती कर्नाटकच्या दिशेने जातील, हा प्राणी अभ्यासक आणि वन अधिकाऱ्यांचा निष्कर्ष होता. त्याला फोल ठरवत पाच हत्तींच्या कळपाने बारमाही वास्तव्य केर परिसरात केले आहे. गुरुवारी रात्री शेतीचे नुकसान केले असून चार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. हत्ती तिलारी परिसरात स्थिरावले असून जवळपास बावीस वर्षे त्यांचे वास्तव्य या परिसरात आहे. मोठा पाऊस सुरू झाल्यावर हत्ती पुन्हा कर्नाटकच्या दिशेने माघारी जातील हा अंदाज होता. मात्र, यावर्षीची परिस्थिती पाहिल्यास सारे अंदाज हत्तींनी फोल ठरले आहेत.
...............
रिकब पोवार
जाणार फ्रान्सला
कणकवली ः येथील रिकब पोवार याची एमबीए शिक्षणासाठी जागतिक ३० नंबरचा दर्जा असलेल्या व फ्रान्समधील ३ नंबरचा दर्जाची युनिव्हर्सिटी असलेल्या
एम्लिओन बिझनेस कॉलेज आॅफ फ्रान्स येथे निवड झाली. रिकबचे प्राथमिक शिक्षण येथील सेंट उर्सुलामध्ये झाले. बी. ई. सिव्हिल ही पदवी प्राप्त केल्यानंतर आता पुढील शिक्षण तो फ्रान्स येथे घेणार आहे. रिकब हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे निवृत्त उपअभियंता विजय पोवार यांचा मुलगा आहे.
--
डॉ. नांदापूरकर
शल्य चिकित्सक
कणकवली ः गेल्या वर्षभराहून अधिक कालावधी रिक्त असलेल्या सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक नांदापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. नांदापूरकर हे पुणे येथील जिल्हा रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या बदलीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शल्य चिकित्सक प्रभारीपद डॉ. श्रीपाद पाटील सांभाळत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84920 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..