फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L41447

ओळ - बांदा ः केंद्रशाळेत अभिवादन करताना विद्यार्थी व शिक्षक.

बांदा शाळेत टिळक
साठेंना अभिवादन
बांदा ः भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. 1 येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांच्या वतीने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा उलगडा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून केला. शाळेतील विद्यार्थी कैवल्य आरोलकर याने लोकमान्य टिळकांची लक्षवेधी वेशभूषा केली होती. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाने परिश्रम घेतले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, रसिका मालवणकर, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, शीतल गवस, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे उपस्थित होते.
................

L41448
ओळ - बांदा ः नट वाचनालयात अभिवादन करताना पदाधिकारी व वाचनप्रेमी ग्रामस्थ.

बांदा नट वाचनालयात
टिळक, साठेंना अभिवादन
बांदा ः येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, नीलेश मोरजकर, संचालिका स्वप्निता सावंत, अनंत भाटे, प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सचिन चांदेकर यांच्यासह वाचक उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग व त्यांचे जीवनकार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84926 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..