दोडामार्गमध्ये दोंदे स्मृतीदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्गमध्ये दोंदे स्मृतीदिन साजरा
दोडामार्गमध्ये दोंदे स्मृतीदिन साजरा

दोडामार्गमध्ये दोंदे स्मृतीदिन साजरा

sakal_logo
By

L४१४६१

ओळ - दोडामार्ग ः ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करताना गुरुदास कुबल. सोबत अन्य पदाधिकारी.

दोडामार्गमध्ये दोंदे स्मृतीदिन साजरा
विविध उपक्रम ः प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ ः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दोडामार्गतर्फे शिक्षक नायक अरुण दोंदे व शिक्षक नेत्या सुलभा दोंदे यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांद्वारे आज साजरा करण्यात आला.
यानिमित्त अखिल संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा केंद्रप्रमुख डी. एन. पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल संघ, सिंधुदुर्गचे जिल्हा प्रवक्ते गुरुदास कुबल, तालुका सचिव भगवान गवस व अखिल संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत शाळा दोडामार्ग नं. १ व ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी सहसरचिटणीस गुरुदास सावंत, सल्लागार राजेंद्र काळबेकर, संतोष नाईक, सुरेंद्र विरनोडकर, ज्येष्ठ सदस्य सुरेश वडर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अरुण दोंदे व सुलभा दोंदे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शिक्षक पतपेढीचे माजी संचालक रामकृष्ण गवस यांनी स्वखर्चाने ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग येथील रुग्णांना फळवाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर यांच्यासह तुषार पवार, दिलीप कळणेकर, रमेश आडे, रश्मी नाईक, लक्ष्मण बरागडे, ईश्वर सुतार, संतोष गवस, आकाश देशमुख, उदय गवस, कृष्णा गवस, अर्जुन दळवी, सुमन कासार, राजलक्ष्मी लोंढे, वेद काळबेकर आणि सेवानिवृत्त असूनही संघटनेप्रती अतिव निष्ठा बाळगणारे श्रीराम सिनारी, राजन कोरगावकर, महिला सेल अध्यक्षा वंदना केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष पूनम पालव, महानंदा गवस, हेमांगी मळीक, मेदिनी सावईकर, स्वाती देसाई, गीतांजली मळीक, राजलक्ष्मी लोंढे, मनोरमा नाईक, दीपाली कळणेकर आदींनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमास उत्स्फूर्त आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्व सभासदांचे तसेच तालुक्याला दादासाहेब दोंदे, अरुण दोंदे व सुलभा दोंदे यांच्या प्रतिमा देणगीरुपात प्रदान करणारे राज्य संघटक प्रशांत पारकर यांचे अखिल दोडामार्ग संघ परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव सावंत यांनी, तर तालुका सल्लागार सुरेंद्र विरनोडकर यांनी आभार मानले.
...................
रुग्णालयास देणगी
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर मशीन दुरुस्तीसाठी संघटनेतर्फे ५००० रुपयांची देणगी वैदयकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. श्री. ऐवळे यांनी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून आर्थिक सहकार्याबद्दल आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84937 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..