रत्नागिरी- भर पावसातही सायकल रॅलीसाठी प्रचंड उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- भर पावसातही सायकल रॅलीसाठी प्रचंड उत्साह
रत्नागिरी- भर पावसातही सायकल रॅलीसाठी प्रचंड उत्साह

रत्नागिरी- भर पावसातही सायकल रॅलीसाठी प्रचंड उत्साह

sakal_logo
By

rat७p१९.jpg
४१४२१
रत्नागिरी : आकाशात फुगे सोडून सायकल रॅलीचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील. सोबत जनजागृती संघ, सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी.
rat७p२०.jpg
४१४१८
रत्नागिरी : सायकल रॅलीत लहान मुलांचाही सहभाग होता. त्यावेळी चौथीमधील विद्यार्थी अर्णव पटवर्धन याचे अभिनंदन करताना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील. सोबत सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी.
-----------
भर पावसातही सायकल रॅलीसाठी प्रचंड उत्साह
घरोघरी तिरंगा; जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब लायन्स क्लबतर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. ७ : सकाळपासून प्रचंड कोसळणारा पाऊस.. त्यातून तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन.. सुरवातीला गर्दी होईल की नाही, अशी चिंता वाटत असतानाही रत्नागिरीतील शंभरहून अधिक सायकलस्वार या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि भर पावसातही सायकलपट्टूंचा उत्साह अधिक असल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य मार्गावरून जाणाऱ्या या रॅलीने घरोघरी तिरंगा लावण्याचा संदेश देण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तिरंगी रंगांचे फुगे आकाशात सोडले व रॅलीला प्रारंभ झाला. त्यांनी सर्व सायकलपट्टूंची ओळख करून भर पावसातही आल्याबद्दल अभिनंदन करत बालदोस्तांचेही विशेष कौतुक केले. भारतमाता की जय, वंदे मातरम यासह स्वातंत्र्यवीर, राष्ट्रपुरुषांचा जयजयकार करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, लायन्स क्लबने याचे यशस्वी आयोजन केले.
मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेसाठी आज सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. पाटील व सौ. पाटील यांनी आकाशात फुगे सोडले आणि रॅलीला प्रारंभ झाला. याप्रसंगी जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, कॅ. कोमल सिंग, सुधीर रिसबूड, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी, दर्शन जाधव, महेश सावंत, योगेश मोरे, निलेश शाह, विनायक पावसकर, श्रद्धा रहाटे, डॉ. सनगर आदींसमवेत लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रविण जैन, सचिव विशाल ढोकळे, ओंकार फडके, पराग पानवलकर, दिप्ती फडके, गणेश धुरी, दत्तप्रसाद कुलकर्णी, राजीव लिमये, प्रमोद खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सायकल रॅलीचा मार्ग जयस्तंभ येथून एसटी स्टॅन्ड, राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौक, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, कॉंग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे पुन्हा जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली.
------------
चौकट
घोषणांनी परिसर दणाणला
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संपर्क युनिक फाउंडेशनचे कार्यकर्तेसुद्धा या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीमध्ये प्रत्येक सायकलला तिरंगा फडकावण्यात आला होता. त्यामुळे सायकल रॅली तिरंगामय झाला. रॅली विविध प्रमुख ठिकाणांवरून जाताना नागरिकांनीही प्रोत्साहन दिले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीदरम्यान सुरस स्नॅक्सने पाण्याची व्यवस्था आणि सांगतेप्रसंगी लायन्स क्लबतर्फे स्नॅक्सची व्यवस्था केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84944 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..