बांदा उपसरपंच कामत यांची नीलेश राणेंनी केली विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा उपसरपंच कामत यांची
नीलेश राणेंनी केली विचारपूस
बांदा उपसरपंच कामत यांची नीलेश राणेंनी केली विचारपूस

बांदा उपसरपंच कामत यांची नीलेश राणेंनी केली विचारपूस

sakal_logo
By

41510
बांदा ः उपसरपंच हर्षद कामत यांची विचारपूस करताना माजी खासदार नीलेश राणे. शेजारी संजू परब, प्रमोद कामत व इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

जखमी बांदा उपसरपंचांची
नीलेश राणेंकडून विचारपूस
बांदा, ता. ७ ः अपघातात पाय गमावल्यामुळे जायबंदी झालेले भाजपचे क्रियाशील बांदा उपसरपंच हर्षद कामत यांची माजी खासदार नीलेश राणे यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. जगातील सर्वात महागडा कृत्रिम पाय बसवून देण्याची ग्वाही देत यापुढील सर्व वैद्यकीय उपचारांचा खर्च स्वतः करणार असल्याचे यावेळी राणे यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, मंडल अध्यक्ष महेश धुरी, युवा नेते सिद्धेश महाजन, ज्ञानेश्वर सावंत, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, मधू देसाई आदी उपस्थित होते. कामत यांचा महिनाभरापूर्वी महामार्गावर नांदगाव येथे अपघात झाला होता. त्यांच्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्यांचा जायबंदी झालेला पाय काढण्यात आला होता. माजी खासदार राणे यांनी कामत कुटुंबियांना धीर देत भाजप पाठीशी असल्याचा विश्वास दिला. जगातील सर्वात महागडा पाय स्वतः खर्च करून बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच पुढील वैद्यकीय उपचारांबाबत निश्चिंत राहावे, असे सांगितले. येत्या दोन महिन्यांत याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगत प्रमोद कामत व अक्रम खान यांनी यासंदर्भातील सविस्तर वैद्यकीय उपचारांची माहिती देण्याची सूचना केली. हर्षद हे भाजपचे क्रियाशील उपसरपंच आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84983 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..