कांदळगावात महात्म्यांना वंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळगावात महात्म्यांना वंदन
कांदळगावात महात्म्यांना वंदन

कांदळगावात महात्म्यांना वंदन

sakal_logo
By

41513
कांदळगाव ः ओझर विद्यामंदिरात अभिवादन करताना शिक्षख वर्ग व इतर.

कांदळगावात महात्म्यांना वंदन
मालवण : ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागृहमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महत्म्यांच्या जयंत्या केवळ प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी नसतात, तर त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांचे अधुरे कार्य पुढे नेण्यासाठी असतात, असे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही लोकमान्य टिळकांबद्दल उत्स्फूर्तपणे भाषणे केली. या कार्यक्रमाचे नियोजन करणारे उत्साही शिक्षक प्रवीण पारकर यांनी लोकमान्य टिळकांचे जीवनकार्य आणि त्यांच्या चतुःसूत्रीबद्दल सविस्तर माहिती दिली. डी. डी. जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आणि मराठी साहित्याला भरीव योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी ओझर विद्यामंदिरचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पी.के. राणे यांनी आभार मानले.
------
41514
कारीवडे ः अपघातग्रस्त टेम्पो.

कारिवडेत टेम्पोला अपघात
सावंतवाडी ः रस्त्यावर पडलेल्या डिझेलमुळे बोलेरो पिकअपला अपघात झाला. ही घटना काल सकाळी कारिवडे येथे घडली. यात चालक सुदैवाने बचावला. मात्र, गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. संबंधित वाहन चालक हा सावंतवाडीतून भाजी आणण्यासाठी आंबोलीच्या दिशेने जात होता. तो कारिवडे येथील वळणावर आला असता रस्त्यावर सांडलेल्या डिझेलमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी शेजारच्या झाडीत जाऊन दगडाला धडकली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात पीकअपचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84986 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..