रत्नागिरी यात्री निवास कर्ज योजनेचे आज लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी यात्री निवास कर्ज योजनेचे आज लोकार्पण
रत्नागिरी यात्री निवास कर्ज योजनेचे आज लोकार्पण

रत्नागिरी यात्री निवास कर्ज योजनेचे आज लोकार्पण

sakal_logo
By

यात्री निवास कर्ज योजनेचे उद्या लोकार्पण
पर्यटन व्यावसायिकांना बुस्टर ; दापोलीत मार्गदर्शक शिबिर
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ७ : रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे पर्यटन जिल्हे म्हणून ओळखले जात असून या दोन्ही जिल्ह्यात पर्यटकांना सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मान्यताप्राप्त न्याहारी व निवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना बँक ऑफ इंडियाने “यात्री निवास कर्ज योजना” सुरू केली असून मंगळवारी (ता. ९) योजनेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात मार्गदर्शनासाठी शिबिर आयोजित केले आहे.
एका बाजूला हिरवेगार डोंगर व दुसऱ्या बाजूला निळाशार असा अथांग अरबी समुद्र याचा आनंद घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी येत असतात. या पर्यटकांना न्याहारी व निवासाची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्या घरात तसेच घराच्या आवारात निवासी खोल्या बांधल्या आहेत व त्याद्वारे ते पर्यटकांना सुविधा देत आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास व न्याहारी योजनेत नोंदणी केलेल्या पर्यटन व्यावसायिकाना पर्यटकांसाठी बांधलेल्या निवासी खोल्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी बँक ऑफ इंडिया तर्फे ‘यात्री निवास योजना’ सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत ५० हजार रूपयांपासून १० लाख रूपयांपर्यंत ५ वर्षे कालावधीसाठी कर्ज देण्यात येणार असून त्यासाठी ८ ते ९.५० टक्के पर्यंत व्याज दर आहे.या योजनेचे लोकार्पण बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय प्रबंधक संतोष सावंत देसाई व एमटीडीसी चे कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांचे हस्ते होणार आहे.

कोट
छोटे पर्यटन व्यावयासिकांच्या घराच्या आवारात एक दोन खोल्या आहेत.त्यांना बुस्टर मिळावा, त्यांनी पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल यासाठी आम्ही जिल्ह्याची लीड बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून पर्यटन व्यावसायिकांसाठी एखादी कर्ज योजना सुरू करावी अशी मागणी केली होती त्याला प्रतिसाद मिळाला आहे.
- सचिन तोडणकर, सरपंच, कर्दे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85007 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..