राजापूर ः राजापूरमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः राजापूरमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी अभियान
राजापूर ः राजापूरमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी अभियान

राजापूर ः राजापूरमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसाठी अभियान

sakal_logo
By

राजापूरमध्ये स्पर्धा परीक्षा
पूर्वतयारीसाठी अभियान
पहिलीपासून करणार तयारी ; अध्ययनानंतर देणार काही वेळ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेतील सहभाग आणि यशाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांनी दिली. तालुक्यातील पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा बालवयापासून स्पर्धा परीक्षेचा पाया अधिक सक्षम करणे आणि स्पर्धा परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाण्याची मानसिकता तयार करण्यात येणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून त्या गुणवत्तेला शाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे काम केले जात आहे; मात्र तरीही नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आदी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का तुलनात्मकदृष्ट्या कमी दिसतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड होत असलेल्या प्रशासकीय सेवेतील तालुकावासियांचा टक्काही नगण्य दिसतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतील तालुक्याचा यशाचा टक्का वाढण्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक शाळा आणि केंद्राला नवोदयसह शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचे ‘टार्गेट’ देण्यात येणार आहे. त्यासाठी दैनंदिन अभ्यासाची शिकवणी करताना दिवसभरातील काही कालावधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.

चौकट
नवोदयमध्ये राजापूरचा वरचष्मा
नवोदय परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून निवड झालेल्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सात आणि माध्यमिक शाळांमधील दोन अशा नऊ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांनी दिली. तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीच्यादृष्टीने ही उल्लेखनीय बाब असल्याचे कडू यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85009 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..