खेड-निळीक येथे घरावर दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-निळीक येथे घरावर दरड कोसळली
खेड-निळीक येथे घरावर दरड कोसळली

खेड-निळीक येथे घरावर दरड कोसळली

sakal_logo
By

rat7p49.jpg-
41519
खेडः निळीक येथे घरावर कोसळलेली दरड.
--------------
निळीकला घरावर कोसळली दरड
खेड, ता. ७ः तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे निळीक-भुवडवाडी येथे एका घरावर दरड कोसळल्याने घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. ही दुर्घटना रविवारी (ता. ६) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. निळीक येथील सुनील भुवड यांच्या घराच्या बाजूला असलेल्या डोंगराची माती घरावर आल्याने घराचे नुकसान झाले आहे. दरड कोसळल्याची वेळ सकाळ घडल्याने मनुष्यहानी झालेली नाही. दरड कोसळल्याचे समजताच सरपंच रेहमान महाडिक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या दुर्घटनेत सुनील भुवड यांच्या स्वयंपाकघराचे नुकसान झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85027 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..