मडुऱ्यात विद्युत वाहिनी तुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुऱ्यात विद्युत वाहिनी तुटली
मडुऱ्यात विद्युत वाहिनी तुटली

मडुऱ्यात विद्युत वाहिनी तुटली

sakal_logo
By

41558
मडुरा ः डिगवाडी येथे तुटलेल्या अवस्थेत असलेली विद्युत वाहिनी.


मडुऱ्यात विद्युत वाहिनी
तुटली; अनर्थ टळला

महावितरणच्या बेजबाबदारपणाबाबत नाराजी

बांदा, ता. ७ ः मडुरा-डिगवाडी येथे शनिवारी सायंकाळी विद्युत वाहिनी तुटली. सुदैवाने शेतकऱ्याच्या व जनावरांच्या जीवावर बेतणारी घटना टळली; मात्र याची कल्पना अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून ‘एलटी लाईनसाठी मला फोन करायचा नाही’ असा निरोप आल्याचे शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी सांगितले. त्यामुळे जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही वालावलकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना करत एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
रविवारी सकाळी वालावलकर हे आपल्या जनावरांना घेऊन शेतात जात होते. जाण्या-येण्याच्या मार्गावरच विद्युत वाहिनी तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले; परंतु काळजी घेतल्यामुळे जीवितहानी टळली. शनिवारी तुटलेली वाहिनी दुसऱ्या दिवशीही तशाच अवस्थेत होती. महत्त्वाचे म्हणजे विद्युत पुरवठाही सुरू होता. गावात वायरमन नसल्याने बांदा कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क केला; परंतु संपर्क न झाल्याने याची कल्पना सावंतवाडी उपविभागीय अभियंता श्री. भुरे यांना दिली. दरम्यान, आम्हा शेतकऱ्यांना विद्युत वाहिनीमधील कुठच्याही लाईन संदर्भात माहिती नसून आम्ही फक्त वाहिनी तुटल्याची कल्पना अधिकाऱ्यांना देतो, ही आमची चूक झाली का? असा प्रश्न प्रकाश वालावलकर यांनी सावंतवाडी उपविभागीय अभियंता यांना करत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्युत वहिनी तुटून यापूर्वीही नुकसान झाले आहे. भविष्यात आमच्या व जनावरांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास महावितरण जबाबदार असेल, असे वालावलकर यांनी सांगितले. उपविभागीय अभियंता सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85031 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..