खेड-आजारी वृद्धेला पाच किमी आणले डोलीतून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-आजारी वृद्धेला पाच किमी आणले डोलीतून
खेड-आजारी वृद्धेला पाच किमी आणले डोलीतून

खेड-आजारी वृद्धेला पाच किमी आणले डोलीतून

sakal_logo
By

rat७p३४.jpg -
४१४९५
खेडः तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी येथील ठमाबाई बाबा माने या वृद्धेला डोलीतून नेताना ग्रामस्थ.
----------
आजारी वृद्धेला पाच किमी आणले डोलीतून
मिर्ले धनगरवाडी ; रस्त्याअभावी ससेहोलपट सुरू
खेड, ता. ७ : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरे होत असताना कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मीर्ले-खोपी या धनगरवाडीमध्ये रस्ताच नसल्यामुळे तेथील एका नव्वद वर्षाच्या आजारी वृद्धेला वाडीतील ग्रामस्थांनी पाच किमी डोली करून गावातील मुख्य रस्त्यावर आणले. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने आतातरी लक्ष देणे गरजेचे आहे.
ठमाबाई बाबा माने या ९० वर्षाच्या वृद्धेला शुक्रवारी (ता. ५) डोलीतून गावातील मुख्य रस्त्यावर आणून नंतर रिक्षाने खेडमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. खेड तालुक्यातील या धनगरवाडीमध्ये मुख्य रस्त्यापासून पाच किमी अंतरावर जावे लागते. दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये ही वाडी वसली आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात या वाडीत जाण्यासाठी साधा रस्ता देखील बनवला गेला नाही. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा होत असताना या गावात मात्र अशा प्रकारे विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या गावात जाण्यासाठी पाच किमीचा रस्ता मंजूर करण्यात आला, मात्र निधीअभावी तो रखडला. रस्ता बनू शकला नाही. त्यामुळे डोली हा पर्याय उरतो. एका बाजूला विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी ही घटना असून मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे गांभीर्याने पाहून कोकणातील धनगर वाड्यांचा विकासाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.
----------------------------
चौकट
एक नजर
* मिर्ले धनगरवाडी लोकसंख्या २००
* रस्ता नसल्याने विकास खुंटला
* पायाभूत सुविधांची वानवा
* रस्ता मंजूर मात्र निधी नाही

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85051 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..