केरवडेतील कोळेकर कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरवडेतील कोळेकर कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाची मदत
केरवडेतील कोळेकर कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाची मदत

केरवडेतील कोळेकर कुटुंबियांना शासनाकडून चार लाखाची मदत

sakal_logo
By

41394
कुडाळ ः रुक्मिणी कोळेकर यांच्याकडे शासकीय मदत सुपुर्द करताना आमदार वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

कोळेकर कुटुंबीयांना
चार लाखांची मदत

कुडाळ, ता. ७ ः केरवडे कर्याद नारुर (ता.कुडाळ) येथील विठ्ठल रामा कोळेकर (वय ५२) यांचा ९ जुलैला निळेली येथील ओढ्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रुक्मिणी कोळेकर यांना शासनातर्फे नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. त्याबाबतचे पत्र आमदार वैभव नाईक व तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते देण्यात आले.
आमदार नाईक यांनी कोळेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आमदार नाईक व तहसीलदार पाठक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कोळेकर कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, नगरसेविका श्रेया गवंडे, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, उपसरपंच तुषार परब, नीलेश सावंत, कृष्णा कुबल, अमित राणे, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85080 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..