मतदार ओळखपत्रास ‘आधार’ जोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार ओळखपत्रास ‘आधार’ जोडा
मतदार ओळखपत्रास ‘आधार’ जोडा

मतदार ओळखपत्रास ‘आधार’ जोडा

sakal_logo
By

मतदार ओळखपत्रास ‘आधार’ जोडा

कांबळे ः देवगड तालुक्यासाठी सूचना

देवगड, ता. ७ ः मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदाराकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. याकामी मतदार नोंदणी नियमानुसार अर्ज तयार करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातील मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करुन घेण्याचे आवाहन येथील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मारुती कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, संबधित सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या माहितीनुसार, मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांशी ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल अ‍ॅपच्या माध्यमातून स्व-प्रमाणीकरण व स्व प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरता येतील. स्व-प्रमाणीकरण भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल अ‍ॅपच्या माध्यमातुन मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतो. तसेच नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त संदेशाद्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे मतदाराचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदाराला नमुना अर्जामध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी (पॅनकार्ड, फोटोसह पासबुक, पासपोर्ट, मतदारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, फोटोसह पेन्शन कागदपत्र केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र) आदी कोणताही एक दस्तऐवज सादर करु शकतील. मतदारांनी मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85091 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..