रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात 14 गावात प्रत्येक घरात पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात 14 गावात प्रत्येक घरात पाणी
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात 14 गावात प्रत्येक घरात पाणी

रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात 14 गावात प्रत्येक घरात पाणी

sakal_logo
By

‘जलजीवन’तर्फे रत्नागिरीतील
१४ गावात नळ पाणी योजना
रत्नागिरी, ता. ८ ः जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या हर घर जलसे नलमधून रत्नागिरी तालुक्यातील १४ गावातील प्रत्येक घरात पाणी पोचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यातील २०१ एकूण महसुली गावांपैकी १९६ महसूल गावांचा समावेश केला असून त्याकरिता १२९.३२ कोटीची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत जलजीवन मिशनमधून वैयक्तिक नळजोडण्या देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्याचा आराखडा बनवण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण होऊ लागली आहेत. यामधून प्रत्येक घराला ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच गावातील प्रत्येक घरात शंभर टक्के पाणी पोचले आहे. त्यामध्ये नांदिवडे ३५ कुटुंबे, गडनरळ-वैद्यलावगण ३४ कुटुंबे, ठिकाणसोमणे ३, ठिकाण चक्रदेव १, पिरंदवणे-वाडाजून ४० यांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात जयगड ५७६, चिंद्रवली-कोंडवी ८८, नवेट १८७, पाली मराठवाडी १२९, हातखंबा-डांगेवाडी १३०, मिरजोळे ठिकाण दाते १२ ही गावे जाहीर होणार आहेत. तसेच गोळप वायंगणी १७६, नांदिवडे कुणबीवाडी ९०, गणपतीपुळे ३०१ येत्या काही दिवसात जाहीर होतील. तेथील पाणीयोजनेची कामे पूर्ण झालेली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85316 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..