चिपळूण ः शांतता समितीत चिपळूणच्या 14 जणांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः शांतता समितीत चिपळूणच्या 14 जणांचा समावेश
चिपळूण ः शांतता समितीत चिपळूणच्या 14 जणांचा समावेश

चिपळूण ः शांतता समितीत चिपळूणच्या 14 जणांचा समावेश

sakal_logo
By

शांतता समितीत चिपळूणच्या
१४ जणांचा समावेश
चिपळूण, ता. ९ः कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हास्तरावरील शांतता समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये आमदार शेखर निकम व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह या समितीमध्ये चिपळूणमधील १४ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निवडकर्त्यांना लेखी आदेशाद्वारे दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हास्तरीय वरील शांतता समितीची दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्थापना करण्यात आली होती. या समितीचा दोन वर्षांचा कार्यकाल २७ जुलैला संपुष्टात आला आहे. तरी आता जिल्हास्तरावरील शांतता समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, व्यापारी दुकानदार, उद्योजक , कामगार, निवृत्त पोलिस अधिकारी, पोलिसमित्र, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या समितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे तर चिपळुणातील १४ विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. यात आमदार निकम यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच संजय मारूती चव्हाण, शौकत माखजनकर, नाझीम अफवारे, संतोष कदम, शौकत मुकादम, सुभाष जाधव, अमिन परकार, इम्तियाज मुकादम, संजय बामणे, अनंत साळवी, नितीन ठसाळे, सुचय रेडीज यांचा समावेश आहे. ही निवड दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावरील शांतता समितीची सभा ही महत्त्वाचे सण व धार्मिक उत्सव आणि ज्या वेळी जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असेल अशा प्रत्येक वेळी शांतता समितीची बैठक आयोजित करावी तसेच राज्यात किंवा राज्यात बाहेर कुठेही जातीय दंगलीचा उद्रेक झाल्यास शांतता समितीची खास बैठक बोलावण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85321 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..