धनगर समाजास न्याय द्या ः काकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनगर समाजास न्याय द्या ः काकडे
धनगर समाजास न्याय द्या ः काकडे

धनगर समाजास न्याय द्या ः काकडे

sakal_logo
By

41918
प्रवीण काकडे

धनगर समाजास न्याय
द्या ः प्रवीण काकडे

महासंघातर्फे प्रशासनाकडे मागणी

तळेरे, ता. ९ ः देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना दुर्गम दऱ्या - खोऱ्यातील, जंगलातील मेंढपाळ धनगर समाज मात्र आजही विकासापासून वंचित आहेत. दुर्गम भागातील धनगर जमातीची त्या त्या जिल्ह्यातील प्रशासनाने पाहणी करावी व केंद्र तसेच राज्याला अहवाल सादर करून धनगर समाजबांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेली ७५ वर्षे धनगर समाज मतदान करत आहे; परंतु सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी धनगर समाजाला अंधारात चाचपडत ठेवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने केंद्राने प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमास आमचा विरोध मुळीच नाही; परंतु भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला राहायला घरच नाही, तर त्यांनी झेंडा कुठे लावायचा, हा प्रश्न आहे. राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्य़ांतील समाजबांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कित्येक समाजबांधवांच्या नावावर घरे किंवा जमिनी नाहीत. मग या समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे का? असा प्रश्न आहे. या सातही जिल्ह्यातील धनगर समाजबांधव आजही आदिवासींप्रमाणेच जीवन जगत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी काकडे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85464 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..