कोकण-कोल्हापूर वाहतुकीला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण-कोल्हापूर वाहतुकीला फटका
कोकण-कोल्हापूर वाहतुकीला फटका

कोकण-कोल्हापूर वाहतुकीला फटका

sakal_logo
By

कोकण-कोल्हापूर
वाहतुकीला फटका
कणकवली ः कोल्हापूर जिल्हात मुसळधार पाऊस झाल्याने कोकणातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोल्हापूर ते राधानगरीमार्ग फोंडाघाटकडे येणारी वाहतूक आज मध्यरात्रीपासुन बंद होती. पहाटे काही प्रमाणात वाहतुकी सुरू झाली. मात्र, लहान वाहने रस्त्यावर अडकुन पडली होती. एसटीबस वाहतुकीवर या पावसाचा परिणाम झाला आहे.
--
गांधीनगरला
सत्कार सोहळा
कनेडी ः गांधीनगर ग्रामपंचायतीतर्फे गावातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. देशाच्या अमृतमोहत्सवी वर्षाचे औचित्य साधुन १५ आॅगस्टला सकाळी नऊ वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सरपंच मंगशे बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, माजी सरपंच महादेव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ वर्षे पुर्ण झालेल्या नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायतीच्यावतीने होणार आहे.
-----------
कनकनगरात
विजेचा लपंडाव
कणकवली ः शहरातील कनकनगर परिसरात गेले दोन दिवस विजेचा लंपडाप सुरू आहे. पावसामुळे सातत्याने विज ये जा करीत आहे. परिसरात वीजेच्या मंद पुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कनकनगरातील वीजेच्या तारांवर झाडांच्या फाद्या वाढल्या आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे वीजेवर परिणाम होत आहे. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85473 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..