रत्नागिरी ः चांदेराई बाजारपेठेला चोविस तास पुराचा वेढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः चांदेराई बाजारपेठेला चोविस तास पुराचा वेढा
रत्नागिरी ः चांदेराई बाजारपेठेला चोविस तास पुराचा वेढा

रत्नागिरी ः चांदेराई बाजारपेठेला चोविस तास पुराचा वेढा

sakal_logo
By

rat९p४.jpg-
४१९११
रत्नागिरीः तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील पुराचे पाणी.
rat९p५.jpg
41912
पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेला चिखल.

गाळ न काढल्याने चांदेराईत पुर
बाजारपेठ २४ तास पाण्यात ; हरचेरी मार्ग बंद, रस्त्यावर चिखल
रत्नागिरी, ता. ९ः काजळी नदीच्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत २४ तासाहून अधिक काळ राहिले होते. दुपारी एक वाजेपर्यंत दोन फूट पाणी होते. पुलावरील पाणी कमी झाले असले तरीही हरचेरीमार्गे लांजाकडे जाणारा मार्ग बंदच होता. पुरापासून सुटका मिळवून देण्यासाठी नदीतील गाळ काढण्यास निधी मंजूर झाला; मात्र संथगतीने केलेले काम, काढलेला गाळ किनाऱ्यावर साचून ठेवल्यामुळे परिस्थिती यंदाही जैसे थेच राहिली आहे.
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले आणि संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. सोमवारी (ता. ८) सकाळी ९ वाजता बाजारपेठेत शिरलेले पाणी दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत २४ तास झाले तरीही कायम होते. नदीचे पाणी कमी तरीही पुराचे पाणी तसेच होते. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ, कचरा किनाऱ्यावरील भागात साचलेला होता. यामधून मार्ग काढणे नागरिकांना अशक्य होते. चांदेराई पुलावरील पाणी ओसरल्याने रत्नागिरीकडे येणारा मार्ग मोकळा झाला. चांदेराईसहित हरचेरी, सोमेश्वर, तोणदे, हातीस या भागातही पुराचे पाणी शिरले होते. काल रात्रीपासून विद्युतप्रवाह खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात राहावे लागले. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरलेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावर कार्यवाही करण्यास आरंभ झालेला नव्हता. चिखल वेळेत दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली तसेच पुरामुळे नुकसान झालेल्यांचे तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशीही मागणी केली जात आहे.
------------------------------
चौकट
काढलेला गाळ पुरात गेला वाहून
काजळी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला. पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी काम सुरू करण्यात आले; परंतु एका पोकलेनने २०० मीटर अंतरावरील गाळ काढला गेला. उर्वरित ९०० मीटरचा परिसर तसाच होता. काढलेला गाळ किनाऱ्यावर टाकल्यामुळे तो पुन्हा वाहून नदीपात्रातच जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले होते. त्यावर हालचाली झाल्या; पण पुढे पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे काढलेला गाळ उचलून बाजूला टाकणे शक्य झाले नाही. सध्या आलेल्या पुराच्या पाण्यात तो वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
---
कोट
दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी बाजारपेठेसह परिसरात शिरते. ही समस्या कायमस्वरूपी असून त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच ग्रामस्थांना या परिस्थितीला समोरे जावे लागते.
- दादा दळी, माजी सरपंच, चांदेराई

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85516 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..