''अमृतमहोत्सव'' सोहळ्यास कुडाळात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''अमृतमहोत्सव'' सोहळ्यास कुडाळात प्रारंभ
''अमृतमहोत्सव'' सोहळ्यास कुडाळात प्रारंभ

''अमृतमहोत्सव'' सोहळ्यास कुडाळात प्रारंभ

sakal_logo
By

L41996

ओळ - कुडाळ ः पंचायत समितीच्यावतीने आजपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा तिरंगा वितरण करून प्रारंभ करताना न्यायाधीश अश्विनी बाचुलकर, श्री. ढोरे, बिडीओ विजय चव्हाण, अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र ः अजय सावंत)

''अमृतमहोत्सव'' सोहळ्यास कुडाळात प्रारंभ
स्फूर्तिगीतांनी रंगत ः पंचायत समितीतर्फे कर्मचाऱ्यांना तिरंगाचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः कुडाळ पंचायत समितीच्या वतीने आज क्रांतिदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. देशाभिमान जागृत करणारी स्फूर्तिगीते यावेळी सादर करण्यात आली. ''हर घर तिरंगा''अंतर्गत कर्मचाऱ्यांना तिरंगाचे वितरण करण्यात आले. उद्या (ता. १०) पंचायत समितीच्या ३१ विभागाअंतर्गत समरगीत स्पर्धा होणार आहेत.
स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव देशाभिमान जागरूक करणाऱ्या विविधांगी उपक्रमांनी दिमाखात साजरा करण्यासाठी कुडाळ तालुका पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून १७ ऑगस्टपर्यंत विविध देशभक्तीपर गीते, देशाभिमान जागृत करणाऱ्या विविध स्पर्धा यांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. क्रांतिदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांनी लाल ड्रेस परिधान केला होता. सर्व कर्मचाऱ्यांना ''हर घर तिरंगा''अंतर्गत तिरंगाचे वितरण करण्यात आले. प्रत्येक कार्यालयासाठी स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव असणारा आकाम लोगो देण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांना आकाम लोगोचा बॅच देण्यात आला. पंचायत समितीच्या प्रांगणात साकारलेल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश (क स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १ अश्विनी बाचुलकर, सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १ पवन ढोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गटविकास अधिकारी चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, बाल विकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उपअभियंता (जलसंधारण) लक्ष्मण डुबळे, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे, कृषि अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, संजय चौकेकर, नंदकुमार धामापूरकर, रवी पोवार, पूजा पिंगुळकर उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ९ ते १७ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. उद्या (ता. १०) या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ३१ विभागांतर्गत समरगीत स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय ६ संघ, शिक्षण विभागचे बिट निहाय ६ संघ, एनआरएलएमचे प्रभाग निहाय ९ संघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी बीट निहाय ८ संघ, पंचायत समिती अधिकारी कर्मचारी तसेच पशुसंवर्धन विभागाचा संघ असणार आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.
................
चौकट
नऊ दिवस
रंग महोत्सव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकात्मिक बालविकास कुडाळ विभागाच्या वतीने ''हर घर तिरंगा'' य़ाप्रमाणे ''हर घर पोषण'' या घोषवाक्यानुसार सलग नऊ दिवस पोषणयुक्त रंगांचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये ९ ते १७ या कालावधीत रंगांच्या साड्या, पोषणयुक्त फळे भाजीपाला आदींचा समावेश असणार आहे.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85535 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..