रोणापाल येथील ग्रामसभेत ''हर घर तिरंगा''चे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोणापाल येथील ग्रामसभेत
''हर घर तिरंगा''चे नियोजन
रोणापाल येथील ग्रामसभेत ''हर घर तिरंगा''चे नियोजन

रोणापाल येथील ग्रामसभेत ''हर घर तिरंगा''चे नियोजन

sakal_logo
By

L४१९९३

ओळ - रोणापाल ः ग्रामसभेत मार्गदर्शन करताना सरपंच सुरेश गावडे व अन्य.

रोणापाल येथील ग्रामसभेत
''हर घर तिरंगा''चे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः आरोग्य, सामाजिक कार्य, सेंद्रिय शेती असे अनेक उपक्रम राबवून देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करूया. १३ ते १५ या तीन दिवसांत प्रत्येकाच्या घरी झेंडा फडकावण्याचा निर्धार रोणापाल सरपंच सुरेश गावडे व सहकाऱ्यांनी केला.
रोणापाल स्वामी दयासागर छात्रालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामसभा सरपंच गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच पप्या केणी, माजी सरपंच उदय देऊलकर व पदाधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, अंगणवाडी सेविका, बचतगट आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रोणापाल माऊली मंदिर येथे माऊली भजन मंडळ, देऊळवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे यशश्री बचतगट, जिल्हा परिषद दवाखाना येथे खेरकटवाडीतील सर्व बचतगट, भरडवाडी अंगणवाडी येथे तेथील पालक व ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा येथे पालक व खेरकटवाडी बचतगट, ख्रिश्चनवाडी चर्च येथे तेथील बचतगट यांनी स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वीकारली. सेंद्रिय शेतीबाबतची माहिती देण्यासाठी निवृत्त कृषी अधिकारी काका परब, आरोग्य विषयक माहितीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना निमंत्रित केल्याची माहिती सरपंच गावडे यांनी दिली. १६ ला जिल्हा परिषद रुग्णालय रोणापाल येथे ग्रामपंचायत रोणापाल आणि एसएसपीएम हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्याचे ठरले. आरोग्य शिबिरात हृदयरोग, नेत्र, किडनी, कॅन्सर, जनरल सर्जरी, युरोलॉजी, दात आणि अस्थिरोग यासह इतरही तपासणी होऊन उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85537 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..