आमदार केसरकरांना समर्थकांकडून शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार केसरकरांना समर्थकांकडून शुभेच्छा
आमदार केसरकरांना समर्थकांकडून शुभेच्छा

आमदार केसरकरांना समर्थकांकडून शुभेच्छा

sakal_logo
By

42037
मुंबई ः मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दीपक केसरकरांना शुभेच्छा देताना केसरकर समर्थक.

‘दीपकभाई आगे बढो,
हम तुम्हारे साथ है’

केसरकरांना समर्थकांचा मुंबईत जल्लोष

सावंतवाडी, ता. ९ ः आमदार दीपक केसरकर यांच्या मंत्रिपदाच्या शपथ विधीसाठी मुंबईला गेलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकानी शपथविधीनंतर राज भवनाच्या परिसरात जल्लोष केला. ‘दीपकभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है'' अशा घोषणा देऊन श्री. केसरकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई गाठत केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. राजभवानाबाहेर केसरकर येताच घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी आमदार केसरकर यांचे समर्थक अशोक दळवी, नारायण राणे, संजय माजगावकर, शैलेश मेस्त्री, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, प्रविण गवस, विशाल तळवडेकर, राजू निंबाळकर, मायकल लोबो, योगेश महाले, विनायक शेटकर, रामदास मेस्त्री, दादा देसाई, सचिन वालावलकर, संतोष शेटये, नितीन मांजरेकर, नितीन शिरोडकर, संदेश निकम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85574 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..