जलक्रीडा, पर्यटन व्यवसायिक महासंघाची लवकरच स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलक्रीडा, पर्यटन व्यवसायिक
महासंघाची लवकरच स्थापना
जलक्रीडा, पर्यटन व्यवसायिक महासंघाची लवकरच स्थापना

जलक्रीडा, पर्यटन व्यवसायिक महासंघाची लवकरच स्थापना

sakal_logo
By

जलक्रीडा, पर्यटन व्यवसायिक
महासंघाची लवकरच स्थापना
तोडणकर ः १५ ला कार्यकारिणी निश्चिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांना एकत्र करून सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ला किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी व खाडी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसायिक व पर्यटन व्यावसायिकांनी मोठ्या मेहनतीने पर्यटन व्यवसाय उभे केले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनवाढीत या सर्व व्यावसायिकांचे महत्त्वाचे योगदान आहे; मात्र शासनस्तरावरील प्रश्नांबाबत नेहमीच या व्यावसायिकांना संघर्ष करावा लागला. पर्यटन व्यावसायिकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांची स्वतःची हक्काची संघटना असावी, या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अनेक पर्यटन व्यावसायिकांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिकांची एकत्रित बैठक तसेच व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेऊन एकमताने महासंघाची कार्यकारिणी निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती श्री. तोडणकर यांनी दिली. पर्यटन व्यवसायात टूर्स व्यावसायिकांचे महत्त्वाचे स्थान आहे. या दृष्टीने कार, रिक्षा व अन्य वाहने जी पर्यटन सफर घडवतील यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स यासाठी येणारे पर्यटक जिल्ह्याची पर्यटन सफर करतील. त्या पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांची पॅकेज निश्चिती करावी, यासाठी टूर्स व्यावसायिकांना सोबत घेऊन महासंघ काम करणार आहे, असे आवाहन श्री. तोडणकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85584 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..