फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L42050

ओळ - मालवण ः सामूहिक राष्ट्रगान उपक्रमात लायन्स क्लबने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रगान उपक्रमात
लायन्स क्लबचा सहभाग
मालवण, : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येथील पालिकेने आज आयोजित केलेल्या समूह राष्ट्रगान कार्यक्रमात येथील लायन्स क्लबने सहभाग घेतला. लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी मेढा येथील दैवज्ञ भवनच्या पटांगणात एकत्र जमून सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीत म्हणत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, सचिव अनुष्का चव्हाण, खजिनदार अंजली आचरेकर, मीना घुर्ये, नीलम मयेकर, पल्लवी खानोलकर, महेश अंधारी, विराज आचरेकर, राजा शंकरदास, महेश कारेकर, अरविंद सराफ, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर, कल्पना सारंग, दिव्या कोचरेकर, हिमानी गायकवाड, मालती काळे आदी सहभागी झाले होते.
-------------
L42051
ओळ - मालवण ः सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबिरास
मालवणात प्रतिसाद
मालवण, : क्रांती दिनाचे औचित्य साधत येथील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आज येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, तहसीलदार अजय पाटणे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महेश जावकर यांच्यासह जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
------------
L42052

ओळ - कुंभारमाठ ः येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकाला अभिवादन करताना तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर व इतर.

हुतात्मा प्रभाकर रेगेंना
मालवणात अभिवादन
मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे यांना आज ऑगस्ट क्रांती दिनी अभिवादन करण्यात आला. यावेळी रेकोबा हायस्कूलच्या विद्यार्थींनी व ग्रामस्थांनी स्मारक परिसराची साफसफाई केली. तहसीलदार अजय पाटणे व गटविकास अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रेकोबा हायस्कुलच्या प्राध्यापकांनी ऑगस्ट क्रांती दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या हुतात्माच्यी माहिती विद्यार्थी व ग्रामस्थांना दिली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पंचायत समिती गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, माजी उपसभापती मधुकर चव्हाण, कुंभारमाठ उपसरपंच किशोर पवार, ग्रामपंचायत सदस्य मनोज वाटेगावकर, पंढरीनाथ माने, ग्रामसेवक गणेश नलावडे, युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, आरोग्यसेवक लक्ष्मण नातेवाड, ग्रामपंचायत कर्मचारी सिध्देश गावठे, कोमल वस्त, आशिष चव्हाण, ग्रामस्थ दामोदर गवई, संभाजी कोरे, आशासेविक सौ. भोगावकर व रेकोबा हायस्कूल विद्यार्थी उपस्थित होते.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85585 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..