कणकवली : भाजप मिशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : भाजप मिशन
कणकवली : भाजप मिशन

कणकवली : भाजप मिशन

sakal_logo
By

42057
कणकवली : येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा प्रवास योजनेची माहिती देताना अतुल काळसेकर, प्रमोद जठार.
-------------------------------------

सेनेच्या बालेकिल्यात भाजपचे ‘मिशन लोटस’
---
गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवसांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर
कणकवली, ता. ९ : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या ताब्‍यात असलेल्‍या १६ लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्‍या अनुषंगाने या मतदारसंघात ‘लोकसभा प्रवास योजना’ आखली असून, केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजयकुमार मिश्रा हे ११ ते १३ ऑगस्टदरम्यान रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेची माहिती लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार आणि लोकसभा मतदारसंघाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी आज येथील भाजप कार्यालयात दिली. श्री. काळसेकर म्‍हणाले, की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे ११ ऑगस्टला जिल्ह्यात येतील. कुडाळ महालक्ष्मी हॉलमध्ये कोअर कमिटीची बैठक होईल; तर दुपारी सव्वातीनला कणकवली भगवती मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच अशा प्रमुख लोकप्रतिनिधींचा मेळावा होईल. सायंकाळी साडेपाचला मालवण किल्ला जेटी येथे नारळी पौर्णिमा कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर राणे कुटुंबीयांच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद होईल. १३ ला सकाळी अकराला पियाळीला (ता. कणकवली) भेट देतील. या वेळी मंडळ अध्यक्ष संतोष कानडे यांच्या निवासस्थानी ग्रामीण भागातील प्रभावशाली लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर साडेअकराला ओरोस येथील इच्छापूर्ती सभागृहात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींबरोबर चर्चा, संवाद मेळावा होईल. दुपारी पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या पिंगळी गुढीपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर तीनला सावंतवाडी राजवाडा येथे बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक होईल. साडेचारला सावंतवाडी मँगो हॉटेल येथे पत्रकार परिषद होईल.
--
१४४ मतदारसंघावर विशेष लक्ष
श्री. जठार म्‍हणाले, की देशातील ३०५ लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्‍यात आहेत; तर १४४ मित्रपक्षांसाठी सोडले होते. या १४४ मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे या मतदारसंघाची जबाबदारी आहे. यातील रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजयकुमार मिश्रा करणार आहेत. पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासाठी विशेष भर दिला जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85599 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..