संगमेश्वर ः केळी लागवडीतून तरुणाने साधली आर्थिक उन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः केळी लागवडीतून तरुणाने साधली आर्थिक उन्नती
संगमेश्वर ः केळी लागवडीतून तरुणाने साधली आर्थिक उन्नती

संगमेश्वर ः केळी लागवडीतून तरुणाने साधली आर्थिक उन्नती

sakal_logo
By

rat९p१०.jpg
42229
संगमेश्वरः शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी केलेली केळी लागवड.

rat९p११.jpg -
42230
केळ्याचे घड

rat९p१२.jpg ः
42231
मकरंद मुळ्ये


केळी लागवडीतून साधली आर्थिक उन्नती
शेतकरी मकरंद मुळ्ये; आठवड्याला १०० डझनचे उत्पादन
संगमेश्वर, ता. १०ः डोंगर उतारावर असणारी जागा, जंगली प्राण्यांचा होणारा त्रास यावर कल्पकतेने मात करत संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील युवा आणि प्रयोगशील शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी गतवर्षी केलेल्या केळी लागवडीतून त्यांना आता समाधानकारक उत्पन्न मिळू लागले आहे. आठवड्याला किमान १०० डझन केळ्यांचे उत्पन्न मिळू लागल्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मुळ्ये यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. सध्या श्रावण त्यानंतर गणेशोत्सव येत असल्याने गावठी केळ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
पर्यावरणीय बदलांमुळे पिकांना आणि विविध शेतमालाला फटका बसतोय, हे जरी खरे असले तरीही प्रयत्न करत राहायलाच हवे,म्हणत संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मुळ्ये यांनी यावर्षी आपल्याच जागेत गतवर्षी २०० गावठी केळींची लागवड केली आहे.
मौजे असुर्डे या दुर्गम गावात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आधारावर मुळ्ये दरवर्षी मिरची, चवळी, पावटा, भुईमूग, पालेभाज्या, भेंडी, वांगी यांची लागवड करतात. या सर्व शेतमालाला संगमेश्वर ही एक मोठी बाजारपेठ असली तरीही मुळ्ये यांनी खासगी ग्राहक जोडून ठेवले असल्याने त्यांना बाजारपेठेत मोठ्या भाजीविक्रेत्याकडे कमी दरात आपला शेतमाल विकण्याची वेळ येत नाही. विविध प्रकारची भाजी संगमेश्वर बाजारपेठेत येईपर्यंत वाटेतच संपत असते, असा मुळ्ये यांचा अनुभव आहे.
भाजीपाल्याबरोबरच सुपारीचे उत्पादनही ते समाधानकारक घेत असून, ठिबक सिंचनद्वारे मुळ्ये यांनी पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यावर फळबाग फुलवता येईल, या हेतूने त्यांनी गतवर्षी सुमारे २०० केळींची लागवड केली. यासाठी त्यांनी घरी असणाऱ्या जुन्या केळींमधूनच या रोपांची निर्मिती केली. गावठी केळ्यांची जात उत्तम असल्याने त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड केल्याने खर्चही कमी झाला. या रोपांना सेंद्रिय खते आणि पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने रोपांची वाढ उत्तम झाली आहे. गावठी केळ्यांना ६० ते ७० रुपये डझन एवढा दर मिळत असल्याने आपल्याला केळी विक्री करण्याची चिंता नसल्याचे त्यानी सांगितले.
-----
चौकट
व्हॉटस्ॲप ग्रूप तयार करणार
गत आठवड्यात एकाचवेळी तोडलेल्या घडातून आपल्याला ५७ डझन केळी मिळाली. केळ्यांचे घड हे एकापाठोपाठ एक असे तयार होत असल्याने आठवड्याला हे उत्पादन १०० डझनपर्यंत देखील पोहचते. सण-उत्सव नसतील तर डझनला ५० रुपये आणि हंगामात हाच दर ६० रुपये होतो. केळ्यांसह अन्य भाजीपाला विक्रीसाठी आता आपण व्हॉटस्ॲप ग्रूप तयार करणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला अधिक उभारी देणार असल्याचे युवा शेतकरी मुळ्ये यांनी सांगितले .
----
चौकट
ग्राहकांकडून मोठी मागणी
संगमेश्वरचे व्यापारी अमोल शेट्ये यांच्याकडे मुळ्ये यांच्या बागेतील केळ्यांना मोठी मागणी असते. दिवसभरात दहा ते पंधरा डझन केळ्यांची विक्री आपण आपल्या दुकानात करत असतो. याबरोबरच त्यांच्या बागेतील गावठी नारळ, भाजी यासाठी ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. या मालाच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85613 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..