संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

समूहगीत स्पर्धेत राधाकृष्ण महिला मंडळ प्रथम
गुहागर ः देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये राधाकृष्ण महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. हिरकणी महिला बचतगटाचा द्वितीय तर कात्यायनी महिला मंडळाचा तृतीय क्रमांक आला. राष्ट्रसेविका समितीने या स्पर्धांचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे रविवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असतानाही या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील ६ महिलांचे संघ गुहागरमध्ये उपस्थित होते. ऑगस्ट क्रांतिदिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रसेविका समिति शाखा गुहागरतर्फे महिलांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा परशुराम सभागृहात ७ ऑगस्टला झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले. या वेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दूल भावे, राष्ट्रसेविका समितीच्या जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले आदी उपस्थित होते. गुहागर, वेळंब, मळण येथील एकूण ६ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक राधाकृष्ण महिला मंडळ, गुहागर, द्वितीय हिरकणी महिला बचतगट, गुहागरने पटकावला तर कात्यायनी महिला मंडळ, गुहागर यांना तृतीय क्रमांक मिळाला.
------------
rat९p१.jpg-
41908
रत्नागिरी - रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
--------------
रोटरी क्लबतर्फे गणवेश वाटप
रत्नागिरीः नुकत्याच झालेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील ४५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. लोकमान्य टिळकांना अभिवादन करून सकाळच्या सत्रात "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. दुपारच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्रीकांत ढालकर अध्यक्ष म्हणून लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नुकतेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षा शाल्मली आंबुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भविष्यात इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी आपले अनुभवही विद्यार्थ्यांना सांगत अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. बर्वे यांनी लोकमान्य टिळकांवरील कवितेचे गायन केले.
-------------
rat९p४७.jpg ः
42067
उद्यानविद्या महाविद्यालयाचा संघ.

सांगुळवाडी उद्यानविद्याचे यश
दाभोळ ः मयूरपंख २०२२ ही सांस्कृतिक स्पर्धा कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीचे ३० विद्यार्थी संगीत, नृत्य, अभिनय, साहित्य आणि ललितकला या पाचही विषयात प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत त्यांनी ललितकलेचे विजेतेपद संपादन करताना मूर्तिकला आणि व्यंगचित्र स्पर्धेचे विजेतेपद व छायाचित्र स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. या सोबतच एकपात्री अभिनय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. मयूर पंख २०२२ या स्पर्धेत २६ महाविद्यालये सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाला विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. पवार, सांस्कृतिक व क्रीडा सल्लागार डॉ. महेश कुळकर्णी आणि इतर सर्व प्राध्यापक मंडळींच्या अनुभवाची जोड मिळाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या उद्यानविद्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साळवी यांनी कौतुक केले व अशाप्रकारे विविध स्पर्धांमध्ये वेळोवेळी सहभागी होऊन महाविद्यालयाचे त्याचबरोबर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करा, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85615 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..