संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

भुवड कॉलनीतील रहिवाशांतर्फे दुध वाटप
देवरूख ः आज दुसऱ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून येथील शिवाजीचौक भुवड कॉलनीमधील रहिवाशांनी भाविकांना मोफत दुध वाटप केले. सह्याद्रीचा कैलास अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. या निमित्ताने आज देवरूखमधील अॅड. राजेश शिंदे , देवदास सावंत, प्रकाश मांगले, गणेश खामकर, समीर भालेकर यांनी हा मोफत दुध वाटपाचा कार्यक्रम केला. शेकडो भाविकांना याचा लाभ मिळाला.
----------
न्यू इंग्लिशकडून जवानांसाठी राख्या
देवरूख ः शहरातील न्यू इंग्लिश स्कूल देवरूखच्या विद्यार्थ्यांकडून सीमेवरील जवानांना नुकत्याच राख्या व संदेशपत्र पाठवण्यात आले. सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्या या कामाला सलाम म्हणून तसेच त्यांच्याबद्दल असलेल्या बंधुत्वाच्या नात्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थांनी राख्या तसेच संदेशपत्र तयार करून शाळेच्या स्काऊट गाईड विभागामार्फत रक्षाबंधन सणासाठी सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. मुलांनी तयार केलेले शुभेच्छा संदेशपत्र तसेच राख्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मधुकर कोकणी यांच्याकडे देण्यात आल्या. या उपक्रमाचे संयोजन गाईड शिक्षिका जान्हवी रुक्के व रीमा केतकर यांनी केले.
----------
मनसे फलकाचे अनावरण
देवरूख ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संगमेश्वर तालुक्यातील पहिल्याच आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या युनिटचे उद्घाटन मनविसे जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख संघटक मनोज कनोजिया व प्रमुख संघटक यश सरदेसाई मनसे तालुकाध्यक्ष, नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनसे शहराध्यक्ष सागर संसारे, मनसे नगरसेविका तथा देवरूखच्या माजी उपनगराध्यक्षा सान्वी संसारे, मनविसे संपर्क अध्यक्ष दिनेश मांडवकर, सहसंपर्क अध्यक्ष मनोहर गोताड आदी उपस्थित होते.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85618 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..