रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat९p२४.jpg ः OP२२L४१९६४ रत्नागिरी ः लायन्स क्लबतर्फे क्रांतिदिनानिमित्त आयोजित तिरंगा रॅलीत सहभागी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह विद्यार्थी व क्लबचे पदाधिकारी सदस्य.

लायन्स क्लबच्या तिरंगा रॅलीला प्रतिसाद
रत्नागिरी ः क्रांतिदिनानिमित्त मंगळवारी सकाळी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीमार्फत शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली आयोजित केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून क्रांतिदिनाचे महत्त्व सर्वांना सांगितले. जयस्तंभ येथून होऊन एसटी स्टँडमार्गे, राम आळी, गोखलेनाका, काँग्रेस भुवन, लोकमान्य टिळक जन्मस्थान शेरे नाका येथून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथपर्यंत रॅली नेण्यात आली. रॅलीमध्ये सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल (उद्यमनगर व शहर), नवनिर्माण हायस्कूल, सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयामधील ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य व उत्तम रॅलीबद्दल बक्षीस वितरण लक्ष्मीचौक येथे करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रविण जैन, सचिव विशाल ढोकळे, खजिनदार रवींद्र प्रसाद उपस्थित होते.


rat९p३३.jpg-२L४१९७७ रत्नागिरी : माहेर संस्थेत आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी संस्थेतील कर्मचारी गृह माता यांची मुले.

माहेर संस्थेत चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हातखंबा, निवळी येथील माहेर संस्थेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आला. आजपासून १७ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबवून अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी माहेर संस्थेत चित्रकला स्पर्धा झाल्या. संस्थेतील कर्मचारी, गृह माता यांची मुले, प्रवेशितांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, घरोघरी तिरंगा, झेंडावंदन व भारताचा रंगीत नकाशा या विषयांवर आकर्षक चित्रे रेखाटली. या स्पर्धेसाठी माहेर बालगृहाचे अधीक्षक सुनील कांबळे, समुपदेशक मीरा गायकवाड व इतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.

जनता बॅंकेतर्फे जनजागृती पदयात्रा
रत्नागिरी ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान साजरे होत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जनता बॅंकेच्या (पुणे) कोकण विभागातर्फे तिरंगा जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा प्रारंभ मारुती मंदिर येथील मारुतीच्या देवळात सामूहिक मारुती स्तोत्र पठणाने झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि जयस्तंभ येथे प्रदक्षिणा करून राम आळी शाखेत सांगता झाली. कोकण विभागातील सर्व शाखेतील ६० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. जनता बॅंक ही सहकार क्षेत्रातील, सामाजिक बांधिलकी जपणारी बॅंक असून समाजाला प्रेरणा देणारे अनेक उपक्रम करीत असते.

rat९p२६.jpg-KOP२२L४१९६६ रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये अॅप्टिट्यूड प्रशिक्षण शिबीरात बोलताना भाविन शाह.

फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये अॅप्टिट्यूडवर शिबिर
रत्नागिरी ः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅड. टेक्नोलॉजी व अॅपटेक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अॅप्टिट्यूड या विषयावर प्रशिक्षण शिबीर झाले. यात कॉंन्टिटेटिव्ह, व्हर्बल, लॉजिकल आणि रिझनिंग स्किल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. अक्षय खांडेकर व भाविन शाह या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. यामध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण शिबीर फिनोलेक्स अॅकॅडमीच्या ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट टीमने प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85620 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..