चिपळूण ः टेरव वेतकोंडवाडीत बसला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः टेरव वेतकोंडवाडीत बसला अपघात
चिपळूण ः टेरव वेतकोंडवाडीत बसला अपघात

चिपळूण ः टेरव वेतकोंडवाडीत बसला अपघात

sakal_logo
By

ratchl93.jpg
42069
चिपळूणः टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला झालेला अपघात.

टेरव वेतकोंडवाडीत
बस अपघातात २ जखमी
चिपळूण, ता. ९ः टेरव वेतकोंडवाडी येथे धावत्या एसटीमध्ये बिघाड झाल्याने बसला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत. क्रेनच्या साह्याने अडकलेली एसटी काढण्यात आली.
टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन अडकली. यामध्ये दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच टेरव गावातील वेतकोंड ग्रामस्थ विश्वनाथ पडव व जयराम महालीम, एकनाथ माळी, सोमा महालीम, टेरव गावातील सरपंच कराडकर, उपसरपंच अशोक साळवी व माजी उपसरपंच किशोर कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसटी आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांना माहिती दिली. दररोज सकाळी टेरव वेतकोंडवाडी येथे चिपळूण आगारातून बस सोडली जाते. या गाडीला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते. तेव्हा सुस्थितीत असलेली एसटी बस द्यावी. अपघातग्रस्त एसटी बस अत्यंत वाईट व नादुरुस्त परिस्थितीत आहे. याबाबत मुखमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शेखर निकम व माजी आमदार रमेश कदम यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे किशोर कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85644 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..