रत्नागिरी ः बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मच्छीमारांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मच्छीमारांना
रत्नागिरी ः बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मच्छीमारांना

रत्नागिरी ः बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मच्छीमारांना

sakal_logo
By

- rat९p४६.jpg- KOP२२L४२०६६
रत्नागिरी ः मिरकरवाडा बंदरात उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका.
(राजेश कळंबटे, सकाळ छायाचित्रसेवा)


वातावरणामुळे मच्छीमारांची एक कोटींची हानी
चौथ्या दिवशी मासेमारी ठप्प ; हंगामाच्या सुरवातीला दणका
रत्नागिरी, ता.९ ः सलग तिसऱ्‍या वर्षी मासेमारी हंगामाच्या सुरवातीलाच बिघडलेल्या वातावरणाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. यावर्षीचा हंगाम सुरू होताच सलग चार दिवस नौका बंदरात नांगर टाकून उभ्या असून अजून चार दिवस, अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
वादळी वाऱ्‍यांमुळे खवळलेल्या समुद्रात जाणेच अशक्य आहे. नारळी पौर्णिमेपूर्वी सुमारे २० टक्के म्हणजेच साधारणपणे सुमारे सातशे नौका समुद्रात मासेमारीला जातात. मासेमारी थांबल्यामुळे एक कोटीच्या घरात मच्छीमारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पर्ससीननेटद्वारे मासेमारी वगळता ट्रॉलिंग, गिलनेटसह अन्य सर्व प्रकारच्या मासेमारीला १ ऑगस्टपासून आरंभ होतो. चारच दिवसात वातावरण बिघडले आणि मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना माघारी परतावे लागले. हर्णै, दाभोळमधील मच्छीमारांनी जयगड, मिरकवाडा येथील बंदरात सुरक्षित ठिकाणी नांगर टाकावा लागला. जिल्ह्यात पर्ससीननेट नौका वगळून सुमारे तीन हजार अन्य प्रकारच्या नौका आहेत. त्यातील सुमारे सातशेहून अधिक नौका सध्या मासेमारीला जाण्यास सज्ज झाल्या होत्या. सुरवातीला जाळ्यात सापडलेल्या बांगड्याला १५० रुपये किलो तर व्हाईट चिंगूळला किलोला ५०० रुपये दर मिळाला होता. ट्रॉलर्सला म्हाकूळ सापडत असून किलोला २५० रुपये दर होता. मासळीला चांगला दर मिळत असल्याने मच्छीमार खुशीत होते. सोमवारी सायंकाळनंतर किनारपट्टीवर ताशी ३० किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहत होते. शेकडो नौका बंदरातच उभ्या होत्या.
सुरवातीला एका नौकेला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपयांची मासळी मिळत होती. गेल्या चार दिवसात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान मच्छीमारी ठप्प झाल्यामुळे सहन करावे लागले आहे. हवामान विभागाने ११ ऑगस्टपर्यंत मच्छीमारांना सतर्क राहा, असा इशारा दिला होता. रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, काळबादेवी, कासारवेली, दापोलीतील हर्णै, दाभोळ येथील हजारो मच्छीमारी नौका समुद्रात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट
वातावरण बिघडल्यामुळे सध्या समुद्र खवळला आहे. मासेमारीसाठी जाणे अशक्य आहे. हवामान विभागाकडून गुरुवारपर्यंतचा इशारा दिला आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
- श्रीदत्त भुते, मच्छीमार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85649 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..