देवरूख ः मृतदेहाची ओळख पटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः मृतदेहाची ओळख पटली
देवरूख ः मृतदेहाची ओळख पटली

देवरूख ः मृतदेहाची ओळख पटली

sakal_logo
By

चिरेखाणीतील मृतदेह
बोथलेवाडीच्या तरुणाचा
देवरूख, ता. ९ ः संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब आडवा मारुती बसथांबानजीकच्या जुन्या चिरेखाणीमध्ये रविवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्या तरुणाचे नाव निखिल प्रभाकर डोंगरे (वय २१) असे आहे. तो नांदळज बोथलेवाडी येथे राहत होता. मुंबईला निघालेला निखिल कोसुंब येथील आडवा मारुती थांब्याच्या पुढील जुन्या चिरेखाणीकडे कसा आला, याचे गूढ उकलायचे आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील जुन्या चिरेखाणीत मृतदेह तरंगताना तेथील कामगारांना रविवारी (ता. 7) दिसून आला होता. राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी त्या चिरेखाणीत उतरून पुरुषाचा कुजलेला मृतदेह बाहेर काढला होता. हा मृतदेह निखिल याचाच असल्याचा त्याची आई रोशनी डोंगरे आणि चुलता यांनी ओळखले. निखिल हा बुधवारी (ता.३) नांदळजहून मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या बसने कोसुंबकडे आला होता. बुधवारी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्याने आईला कॉल करून मुंबईला रेल्वे कनेक्शन बसने कोसुंब स्टॉपवरून जात असल्याची माहिती निखिलच्या आईने देवरूख पोलिसांना दिली; मात्र मुंबईला निघालेला निखिल हा मुंबईला न जाता कोसुंब येथील आडवा मारुती थांब्याच्या पुढील जुन्या चिरेखाणीकडे कसा आला? याची उकल पोलिस तपासाअंतीच होणार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पवार करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85652 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..