भाजपच्या सत्ताकाळात अवाजवी खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या सत्ताकाळात अवाजवी खर्च
भाजपच्या सत्ताकाळात अवाजवी खर्च

भाजपच्या सत्ताकाळात अवाजवी खर्च

sakal_logo
By

भाजपच्या सत्ताकाळात अवाजवी खर्च

संतोष तारी ः जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करू

देवगड, ता. ९ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील तत्कालीन भाजप सत्ता काळातील झालेल्या अवाजवी खर्चाच्या अनुषंगाने अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या काळातील कारभाराची जिल्हाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना गटनेते संतोष तारी यांनी दिली.
भाजपकडून विद्यमान सत्ताधारी शिवसेनेवर होत असलेल्या टीकेच्या अनुषंगाने श्री. तारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपवर टीकास्त्र सोडताना त्यांच्या काळातील कामांचा पाढाच त्यांनी वाचला. आमच्यावर टीका करण्याआधी आपल्या कार्यकाळातील कारभार त्यांनी पाहावा, असा सल्लाही दिला. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, तेजस मामघाडी, नगरसेविका मनीषा घाडी आदी उपस्थित होते.
श्री. तारी म्हणाले, "तत्कालीन भाजप सत्ताधार्‍यांनी जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केली. देवगड जामसंडे शहराच्या डास निर्मूलनासाठी फॉगींग यंत्राद्वारे फवारणी करण्यात येत होती; मात्र प्रत्यक्षात कमी वापर करून महिनाभर फॉगींग केल्याचे दाखवून दरदिवशी सुमारे दोन हजार याप्रमाणे खर्चाची बिले काढली जात होती. तसेच शहरातील नागरिकांच्या स्वच्छतागृहाच्या टाकीच्या सक्शन गाडीसाठी महिन्याला सुमारे ९०० लीटर डिझेलचा वापर झाल्याचे दाखवून त्यावर सुमारे ७२ हजाराचा खर्च दाखवला जात होता; मात्र उत्पन्नाचा विचार करता सुमारे पाच ते सहा हजारच दाखवले जात होते. बंद असलेल्या घंटागाडीसाठी डिझेल खर्च दाखवून इंधनाची उधळपट्टी सुरू होती. या सर्वाला आम्ही सत्तेत आल्यानंतर आळा घातला आहे. अवाजवी होणारा खर्च बंद केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दर महिना सुमारे दोन लाख रूपये खर्चात बचत केली जात आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून मागील पाच महिन्यांत आतापर्यंत सुमारे दहा लाख रुपये नगरपंचायतीचा स्वनिधी वाचवला आहे. यातून जनतेच्या पैशाची बचतच झाली असल्याचा दावा श्री. तारी यांनी केला. भाजपच्या सत्ता काळातील झालेल्या अवाजवी खर्चाची चौकशी लावावी, अशी मागणी करणार आहोत. भाजप नगरसेवक शिवसेना सत्ताधार्‍यांवर टीका करीत असले तरी त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कारभाराची आठवण त्यांना करून द्यावीशी वाटते.
--
अखर्चित निधीच घनकचऱ्यासाठी
घनकचऱ्यावरून भाजप नगरसेवक आगपाखड करीत असले तरीही त्यांच्या कार्यकाळात घनकचरा व्यवस्थापनासाठी तालुक्यातील टेंबवली येथे जागा खरेदी करण्यात आली आहे; मात्र संबंधित ग्रामपंचायतीकडून अद्याप नगरपंचायतीला नाहरकत दाखलाही प्राप्त झालेला नसताना आडमुठी धोरणामुळे जनतेच्या वापराचा निधी सुमारे दोन वर्षे अखर्चित होता. हाच निधी शहराच्या घनकचरा व्यवस्थापन कामासाठी वापरला जाणार असल्याचेही श्री. तारी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85667 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..